नवीन लेखन...

गाण्याच्या कहाण्या – ‘पिया ऐसो जीयामे समाय गयो’

‘पिया ऐसो जीयामे समाय गयो –‘ एक कलरफुल गाणे

हिंदी सिनेमाचा इतिहास लिहिताना ,गुरु दत्तचा ‘साहब ,बीबी और गुलाम ‘हा सिनेमा वगळून लिहता येणार नाही. त्या वेळीस ,म्हणजे मी तसा पक्का सिनेमबाज नव्हतो म्हणा, आणि वय हि बालिशच होत ,संधी असून हि मी तो पाहायचा टाळला होता. कारण काय?तर त्यात मीनाकुमारी होती ! ‘एक रडकी हिरॉईन ‘ हा त्या वेळेसचा ग्रह बरेच दिवस तसाच होता.

Voice of the Past या चॅनल वाल्यानी ,मीनाकुमारीच्या त्रयांशीव्या ऍनिव्हर्सरी निमित्याने ,या महान ‘अदाकारास ‘ ट्रीबुट म्हणून ‘साहब ,बीबी और गुलाम ‘ या  कृष्ण धवल सिनेमातील मीनाकुमारीचे एक गाणे कलराइज केलंय(२०१६).’पिया ऐसो जिया मे समाय गयो रे ,कि मै तन मन कि सुध -बुध गवा बैठी –‘ ते गाणे आहे. मी तो व्हिडीओ पहिला आणि मीनाकुमारी विषयी असलेला माझा दृष्टिकोन बदलून गेला.

गाण्याची सिच्युएशन , गाण्यातील शब्द ,त्यांना संगीताच्या रेशमी सुरात केलेली गुंफण, त्यावर प्याशनेट आवाजाची गायिका आणि कसदार अभिनयाची जोड ,हे सार या गाण्यात इतकं एक जीव झालाय कि त्यांना वेगळं करता येत नाही. व्हायचा तोच परिणाम झालाय. कानाला आणि दृष्टीला मेजवानी.!

सिच्युएशन आहे कि एक विवाहित स्त्री ,आपल्या पतीच्या आगमना प्रित्यर्थ शृंगार करत आहे,तिच्या दासी तिला सजवत आहेत. आणि ती सांगत आहे कि ‘पिया ऐसो जिया मे समाय गयोरे ,’कि ती ‘तन -मन कि सुध -बुध ‘ हरवून बसलीय ! थोडीशी चाहूल लागली की ‘ते ‘ आले कि काय ?असे वाटतंय !अन मग ती काय करते ? तर कधी झटकन ‘घुंघट मे मुखडा छुपाई बैठी !’ वगेरे .

आपल्या पतीची वाट पहाणाऱ्या तरुण पत्नीच्या मनाची रनिंग कॉमेंट्री या गाण्यात शकील बदायुनी यांनी समाविष्ट केली आहे. तिची अधीरता,मनाला लागलेली ओढ, लज्जा ,हुरहूर सार शब्दबद्ध शकील यांनी केलाय. भोजपुरी शब्दांची लडिवाळ पेरणी, जसे ‘ जियामे समाई गयो ‘,’आईगयो ‘ गाण्याची लज्जत वाढवून गेलेत. अशीच खुमारी त्यांनी ‘मोहे भूल गये सावरिया –‘ या बैजू बावरा च्या प्रसिद्ध विराणीत पण वापरलाय. नायिकेच्या मन मांडवातून ते भावना शब्दात कैद करून गाण्यात पेश करतात. हि शकील बदायुनीची खासियत आहे.

हेमंत कुमारच्या सांगितला,शकीलच्या गीताला, आणि मीनाकुमारीच्या अभिनयाला पॅशनेट आवाज दिलाय तो गायिका गीता दत्त यांनी. मीनाकुमारीच्या आवाजाच्या पट्टीला आणि गाण्याच्या मूडला गीतादत्तचा आवाज एकदम समरस झालाय.

भलेही संगीतकार हेमंत कुमार असो,गीतकार शकील बदायुनी असो ,वा गाणाऱ्या गीता दत्त असो ,पण हे गाणं आहे ते दोघांचेच . एक मीनाकुमारी ,जिच्यावर हे गं पिक्चराईझ झालंय ती , आणि तो कॅमेरा मागचा डोळा ,जानी हे गाणं शूट केलंय ते सिनेम्याटोग्राफर व्ही के मूर्थी !

एक परीप्कव ,शालीन ,खानदानी सौंदर्य , त्याला आवश्यक असलेला आदब , तारुण्य सुलभ देहबोली या गाण्यात मीनाकुमारी सहजतेने प्रगट करते.अभिनयाच्या ‘बाप ‘मंडळीत मीनाकुमारी खूप वरच्या रांगेतली.या गाण्यात हेच पुन्हा एकदा सिद्ध तिने सिद्ध केलाय. ‘हर आह्ट पे ओ आई —‘ या ओळीला जो तिने शार्प लुक तो केवळ ‘अप्रतिम’ किवा ‘लाजवाब ‘या शब्दात मावत नाही ! मीनाकुमारीच्या पापण्याची हालचाल आणि त्यातल्या हळुवार फिरणाऱ्या नजरेच्या लय, फक्त या साठी मी हे गाण सलग दोन वेळेस पाहिलंय !(तुम्ही हि पहा , ‘नजरबंदी’चा अर्थ तुम्हाला जाणवेल!)

हे गाण मी अजून एका कारणासाठी ‘पहा’ म्हणून रिकमंड करीन. ते म्हणजे मिनाकुमारीचे या गाण्यातील क्लोजअप्स ! सौंदर्याचे मापदंड तुम्हास पाहायला मिळतील!मूर्थी यांनी काय सुरेख क्लोजअप्स टिपलेत ?!ते शब्दात नाही सांगता येणार . पाहूनच अनुभवावे लागतील. १९५३ साली कमाल अमरोहीने ‘दायरा’ बनवला होता. त्यात मीनाकुमारीचा तब्बल तेरा मिनिटाचा क्लोजआप आहे, ज्याची Longest closeupम्हणून गिनीज बुकात नोंद झाली आहे !!

शेवटी स्पेशल Thanks टू Voice of the Pastला ,एक अप्रतिम कलाकृती अधिक कलरफुल करून दाखवल्या बद्दल .

आणि हो तुमच्या साठी गाण्याची लिंक देतोय.पहा , एका आणि मगच comments आणि like करा.

— सु र कुलकर्णी.

आपल्या प्रतिक्रियांची वाट पहातोय. पुन्हा भेटूच . Bye.

Avatar
About सुरेश कुलकर्णी 176 Articles
मी सुरेश कुलकर्णी. . साधारण कथा , लेख ,जुन्या सिनेमाच्या (हिंदी )गण्यावर माझे लिखाण असते . एखादे छानसे पुस्तक वाचण्यात आले तर त्यावर हि लिहतो . माझ्या वाचकास एक नम्र विनंती माझे लिखाण आवडले तरी ,आणि नाही आवडले तरी जरूर कळवा माझ्या लिखाणाचा पोत त्या शिवाय सुधारणार नाही .माझे सर्व लिखाण काल्पनिक असते .. mb.6361255994. किवा srk101252@gmail --संपर्का साठी

महासिटीज…..ओळख महाराष्ट्राची

रायगडमधली कलिंगडं

महाराष्ट्रात आणि विशेषतः कोकणामध्ये भात पिकाच्या कापणीनंतर जेथे हमखास पाण्याची ...

मलंगगड

ठाणे जिल्ह्यात कल्याण पासून 16 किलोमीटर अंतरावर असणारा श्री मलंग ...

टिटवाळ्याचा महागणपती

मुंबईतील सिद्धिविनायक अप्पा महाराष्ट्रातील अष्टविनायकांप्रमाणेच ठाणे जिल्ह्यातील येथील महागणपती ची ...

येऊर

मुंबई-ठाण्यासारख्या मोठ्या शहरालगत बोरीवली सेम एवढे मोठे जंगल हे जगातील ...

Loading…

error: या साईटवरील लेख कॉपी-पेस्ट करता येत नाहीत..