नवीन लेखन...

प्लास्टर ऑफ पॅरिस (पीओपी)

गणपतीच्या मूर्ती प्लास्टर ऑफ पॅरिसच्या बनवल्याने पर्यावरणाची हानी होते, या मुद्द्यावर न्यायालयाने मार्गदर्शक तत्त्वे सांगितल्याने सध्या वाद निर्माण झाला आहे पण हे प्लास्टर ऑफ पॅरिस म्हणजे पीओपी अगदी जुन्या काळापासून मूर्ती व चित्रकृती तयार करण्यासाठी वापरले जात होते.

विशेष म्हणजे हाडांना फ्रॅक्चर झाल्यावर जे प्लास्टर केले जाते त्यातही पीओपीच वापरलेले असते. त्याच्या नावात पॅरिस असले तरी त्याचा शोध मात्र इजिप्तमध्ये लागला. शेऑप्स येथील पिरॅमिडमध्ये पीओपीचा वापर केलेला होता. पॅरिसमधील मॉन्टमारटर येथे जिप्समचे मोठे साठे असल्याने या नावात पॅरिस आले. इजिप्त देशात अनेक थडग्यांमध्ये त्याचा वापर केलेला होता. नंतर ग्रीकांनीही त्याचा वापर सुरू केला. पीओपी जिप्समपासून बनवतात. हे जिप्सम प्रवाळ बेटांतील सागराच्या पाण्याचे बाष्पीभवन झाल्यानंतर तयार होते. त्यात अशुद्धतेमुळे पांढरे, तपकिरी, पिवळे, राखाडी, गुलाबी असे रंग असतात.

प्लास्टर ऑफ पॅरिसची (कॅल्शियम सल्फेट हेमिहायड्रेट) निर्मिती करताना जिप्सम उच्च तापमानाला (१२० ते १८० अंश सेल्सियस) गरम करून कॅल्शियम सल्फेट तयार करतात, त्याची वस्त्रगाळ पावडर बनवली जाते. या पावडरमध्ये पाणी मिसळले की जे मिश्रण तयार होते त्याला कुठलाही आकार सहजपणे देता येतो, शिवाय अतिशय गुळगुळीत पृष्ठभागही त्यात तयार करता येतो त्यामुळे मूर्ती व त्यांचे साचे तयार करण्यासाठीही पीओपीचा वापर केला जातो.

पीओपी हे आगरोधक असते त्यामुळे घरातही ते वापरले जाते. एकदा बिग लंडनमध्ये लागलेल्या आगीनंतर फ्रान्सच्या राजाने सर्व घरांमध्ये पीओपीचे संरक्षक आवरण असले पाहिजे असे फर्मान काढले होते. त्यामुळे १६६६ पासून पॅरिसमध्ये पीओपीचा वापर जास्तच होता. पीओपी वाळल्यानंतरही आक्रसत नाही त्यामुळे त्यावरील बोटांचे ठसे हे न्यायालयात पुरावा म्हणून अधिक ग्राह्य धरले जातात. पीओपीच्या पावडरमध्ये पाणी मिसळताना उष्णता बाहेर पडते.

त्यात हात गंभीररीत्या भाजण्याचा धोका असतो त्यामुळे काळजी घ्यावी लागते. त्यामुळेच वैद्यकीय वापरासाठी प्लास्टर तयार करताना त्याचे पातळ थर व मध्येच कापडाचे तुकडे वापरले जातात. ते लगेच घट्ट गोळ्यासारखे होते. त्यामुळे ते कुठे अडकले तर पाण्याचा प्रवाह अडू शकतो. चित्रकार मायकेल अँजेलो याच्या अनेक चित्रांची निर्मिती ही प्लास्टरवर केलेली आहे त्यामुळे पीओपी हे कलेचे एक साधन आहे. घरांच्या सजावटीसाठी लाइमस्टोन व ऑक्रिलिकवर आधारित प्लास्टरचा वापर केला जातो त्यामुळे भिंती अधिक सुबक व सुंदर दिसतात.

Be the first to comment

Leave a Reply

Your email address will not be published.


*


महासिटीज…..ओळख महाराष्ट्राची

रायगडमधली कलिंगडं

महाराष्ट्रात आणि विशेषतः कोकणामध्ये भात पिकाच्या कापणीनंतर जेथे हमखास पाण्याची ...

मलंगगड

ठाणे जिल्ह्यात कल्याण पासून 16 किलोमीटर अंतरावर असणारा श्री मलंग ...

टिटवाळ्याचा महागणपती

मुंबईतील सिद्धिविनायक अप्पा महाराष्ट्रातील अष्टविनायकांप्रमाणेच ठाणे जिल्ह्यातील येथील महागणपती ची ...

येऊर

मुंबई-ठाण्यासारख्या मोठ्या शहरालगत बोरीवली सेम एवढे मोठे जंगल हे जगातील ...

Loading…

error: या साईटवरील लेख कॉपी-पेस्ट करता येत नाहीत..