तिस्ता नदीच्या पाणीवाटपाचा प्रश्न
तिस्ता नदीच्या पाणीवाटपाचा प्रश्न या दौऱ्यातही तरंगताच राहिला.पण पाणीवाटप करार झाला नाही.ईशान्य भारतातून मुक्त वाहणारी तिस्ता पुढे बांगला देशात जाते. परंतु या पाण्याचे आपणास काहीही करता येत नाही, ही ममतांची रास्त खंत आहे. या पाण्याचे काही करावयाचे तर प. बंगालकडे त्यासाठी साधनसुविधा नाहीत.धरण बांधण्यासाठी त्यांना केंद्राच्या मदतीची गरज लागेल. त्यामुळे ममतांची भूमिका आडमुठेपणाची आहे.आगामी वर्षांत प. बंगालात विधानसभा निवडणुका आहेत. निवडणुकीच्या तोंडावर असा आडमुठेपणा राजकीयदृष्टय़ा फायदेशीर असतो. त्यामुळे या दौऱ्यात तिस्तेचा तिढा सुटला नाही.जमीन वादासोबतच ५४ नद्यांचा वाद, प्रामुख्याने तिस्ता आणि फेनी या दोन नद्यांच्या पाणीवाटपाबद्दल भारताची भूमिका सकारात्मक राहील, अशी ग्वाहीही मोदींनी दिली. दोन्ही देशांनी व्हिसा प्रक्रिया सुलभ होण्यासाठी आपापल्या देशात विशेष केंद्रे स्थापन करण्याचा निर्णय घेतला
बांगलादेशमधे हिंदूवर क्रूर अत्याचार
या शिवाय एक धोक्याचा इशारा. तो बांगलादेशमध्ये वाढत्या इस्लामी कट्टरपंथीयांबाबत. आज बांगला देश हा असा इस्लामी माथेफिरूंचे आश्रयस्थान बनलेला आहे. तेव्हा तो भारताशी इतकी जवळीक साधणार असेल तर ते त्यांना अर्थातच आवडणार नाही. अशावेळी त्या देशातील कट्टरपंथीय उचल खाण्याची शक्यता असून त्यांना पाकिस्तान, चीन आणि अन्य इस्लामी देशांची साथ मिळणार यात शंका नाही. असे झाल्यास हसीना किती भारतप्रेमी राहू शकतात, ते पाहावे लागेल. ते दडपण हसीना यांना मानवेल काय, हा खरा प्रश्न आहे,
बांगलादेशची निर्मिती झाली तेव्हा ते एक धर्मनिरपेक्ष राष्ट्र होते. पण, निर्मितीनंतर काही वर्षे गेली अन् बांगलादेशने स्वत:ला निधर्मी राष्ट्र म्हणविणे बंद केले. त्यांनी स्वत:ला इस्लामिक राष्ट्र म्हणून घोषित केले. बांगलादेशसोबत असलेले आपले संबंध बिघडत गेले. बांगलादेशातून मोठ्या प्रमाणावर घुसखोरी वाढली. आज कोट्यवधी बांगलादेशी नागरिक भारतात अवैधरीत्या घुसले आहेत आणि इथेच स्थायिक झाले आहेत. बांगलादेशी घुसखोरीमुळे भारतासमोर वेगळी समस्या उभी ठाकली आहे. आसामसारखे राज्य बांगलादेशी मुस्लिमबहुसंख्य होते की काय, अशी भीती निर्माण झाली आहे. बांगलादेशातील हिंदू बांधवांवर क्रूर अत्याचार केले जात आहेत. बांगलादेशात हिंदूंची घरे लुटली जात आहेत, हिंदू स्त्रियांवर अत्याचार केले जात आहेत. हिंदूंवर अन्याय केला जात आहे. बांगलादेश जर आपल्या वर्तनात बदल करणार नसेल अन् दिवसेंदिवस त्या देशातील राज्यकर्त्यांची हिंदू समाजाबद्दलची भूमिका क्रूरतेकडेच वाटचाल करणार असेल, तर भारताला हे थांबवावे लागेल.
२०११ च्या लोकसंख्या आकडेवाडीप्रमाणे बांगलादेशमध्ये हिंदूची संख्या ही अतिशय कमी होत आहे. बांगलादेशमध्ये हिंदुच्या जमिनी बळजबरीने घेऊन त्यांना भारतामध्ये जाण्यास भाग पाडत आहेत. गरज आहे ती आपण बांगलादेश सरकारशी मदत घेऊन बांगलादेशात हिंदुविरुद्ध चाललेली कारवाई ही थांबवण्याकरिता त्यांना भाग पाडायला पाहिजे. भू सीमा करार झाल्यामुळे ,त्याचा वापर करून बांगलादेशाशी चांगले संबंध तयार करून भारतामध्ये होणारी बांगलादेशी घुसखोरी थांबवण्यामध्ये आपल्याला नक्कीच यश मिळू शकेल.
बांगला देशास आपल्या बाजूस वळवणे गरजेचे
भारत आणि बांगला देश यांच्यात तब्बल ४१०० किमीची सीमारेषा आहे आणि त्या देशाला आपल्या बाजूला राखणे गरजेचे आहे. त्यास प्रमुख कारणे दोन. एक पाकिस्तान आणि दुसरे चीन. या दोन देशांतील परस्पर सौहार्द वाढत असताना बांगला देशास आपल्या बाजूस वळवणे गरजेचे होते. ते मोदी यांच्या दौऱ्याने साध्य झाले असे म्हणता येईल. याची पावती म्हणजे त्या देशातील प्रमुख विरोधी पक्षनेत्या बांगला देश नॅशनलिस्ट पार्टीच्या बेगम खलिदा झिया यांचे विधान. बेगम झिया यांची राजवट पूर्णपणे भारतविरोधी होती आणि पाकिस्तानची आयएसआय आणि चीनच्या गुप्तहेर यंत्रणेस त्यांच्या काळात बांगला देशात पूर्ण वाव होता. विद्यमान पंतप्रधान, अवामी लीगच्या बेगम शेख हसीना आणि झिया यांच्यात वैर आहे. तरीही बेगम झिया यांनी मोदी यांच्या बांगला देश दौऱ्याचे आणि त्यातही दाखवलेल्या औदार्याचे जाहीर कौतुक केले असून यापुढे भारताविरोधात भूमिका न घेण्याचे जाहीर केले. हे मोठेच यश म्हणावे लागेल.एकूणच मोदींचा हा दौरा फलदायी ठरला आहे. आता बांगलादेशने दिलेली वचने तो देश पाळतो की नाही, यावर दोन्ही देशांचे संबंध अवलंबून असणार आहेत.
Leave a Reply