पुरुषोत्तम नारायण गाडगीळ अर्थात पु. ना. गाडगीळ’ हे नाव आणि सुवर्णपेढी कुणाला माहिती नसेल असं क्वचितच घडेल. तब्बल सहा पिढ्यांची ही सुवर्णपेढी. “पु. ना. गाडगीळ अॅंण्ड सन्स” या नावाने संपूर्ण हिंदुस्थानातील एकमेव आणि सर्वात जुनी आहे. मैत्रीपूर्ण विश्वास आणि व्यवहारिक नात्यापेक्षा घट्ट – माणूसकीचे नाते जपत PNG नी सुवर्णाहूनही अमूल्य ठरावे असे माणुसकीचे नाते आणि मैत्रीचा विश्वास वृद्धिंगत केला.
महाराष्ट्रातील आताचा जिल्हा आणि पूर्वीचे सांगली संस्थान. या गावातील एका फुटपाथवर महिलांसाठी अलंकार विकण्याचा व्यवसाय गणेश नारायण गाडगीळ करीत होते. १८३२ ला जन्मलेल्या गणेश नारायण गाडगीळ यांच्या ‘PNG’ चा अतूट सुवर्णधागा आजही नाते जपत सामाजिक बांधिलकीचा विश्वास टिकवून आहे. सांगलीच्या फुटपाथवरील गणेश नारायण गाडगीळ यांच्या व्यवसायाला ऊन-वारा-पाऊस यापासून संरक्षण व्हावे म्हणून आणि सुवर्णालंकार खरेदी करताना महिला वर्गाला उन्हा-वाऱ्याचा त्रास होऊ नये म्हणून त्यांनी फुटपाथवरच एक शेड बांधली. पुढे हीच जागा “दुकाना”मध्ये रूपांतरित झाली.
असं म्हणतात की. एखादी कला वा नैसर्गिक देणगी ही एकानंतर दुसऱ्या पिढीतील कुणाकडे तरी त्या पिढीत सुरू राहते. गणेश गाडगीळ यांचे नातू नारायण यांनी या व्यवसायाची जबाबदारी स्वीकारली. येथून पुढे मात्र सलग पिढीने हा व्यवसाय वटवृक्षाप्रमाणे मोठा आणि दीर्घायुषी केला. नारायण यांना तीन मुलगे. पुरुषोत्तम, गणेश आणि वासुदेव हे तिघेही मोठे झाले. तशी नारायण यांनी मुलांना ‘तुम्ही पुढे जायला हवं’ असं सांगितले. शिवाय व्यवसायातील पारदर्शकता आणि सुवर्णातील शुद्धता हे दोन गुण म्हणजे हिंदुस्थानच्या पातिव्रत्य सांभाळणाऱ्या पारंपरिक स्त्रीने तिचं पातिव्रत्य जपण्याला महत्त्व देण्याइतके मौल्यवान आहेत, याची शिकवण त्यांनी त्यांच्या पुढच्या पिढीला दिली.
आजही सुवर्ण खरेदी करताना महिला आणि ग्राहकवर्गाचा विश्वास सराफ बाजारात PNG यांनी कायम ठेवलेला आहे. त्यांची दुसरी ओळख म्हणजे नक्षीदार अलंकरणातील अद्भूतता ! वेळेचं गांभीर्य आणि एका जागी न थांबता सातत्याने नावीन्य शोधणं ! या त्रिसूत्रीवर अगदी पहिल्या आघाडीवर, किरकोळ विक्रीसाठी हिंदुस्थानात PNG चे नाव विश्वासाने चालते.
संपूर्ण जगभरातून PNG यांच्याकडे त्यांना हव्या असणाऱ्या डिझाईन्समधील मागणी होत असते. “BIS Hallmarked दागिनेच घ्या” असा आग्रह धरणाऱ्या PNG च्या दागिन्यांना म्हणून शुद्धतेची झळाळी आहे. आपल्याकडे ‘खानदानी’ हा शब्द विशिष्ट विश्वासाबरोबरच आदर आणि नात्याचं द्योतक म्हणून मानला जातो. हेच खानदानीपण सिद्ध करण्यासाठी PNG यांनी ‘पुरुषोत्तम नारायण गाडगीळ’ अर्थात “पु. ना. गाडगीळ” हे नाव LOGO आणि SYMBOL म्हणून कायम ठेवले… ग्राहकांची विश्वासार्हता टिकविणे आणि कायम ठेवणे हा मुख्य हेतू जतन करण्यासाठी..!
पुरुषोत्तम यांना ३ मुली. गणेश यांना ३ मुले आणि वासुदेव यांना ४ मुले. ही त्यांची पुढची पिढी होय. १९५८ मध्ये त्यांनी व्यवसायवृद्धीसाठी पुणे गाठले. १९१५ साली जन्मलेल्या अनंत गणेश गाडगीळ यांनी पुण्याच्या सुवर्णपेढीची जबाबदारी स्वीकारली. अनंत यांना ‘दाजीकाका’ या नावाने ओळखले जायचे. वयाची ९९ वर्षे पूर्ण झाल्यानंतर पाच वर्षांपूर्वी त्यांचे पुण्यात निधन झाले.
— प्रा. गजानन शेपाळ
Leave a Reply