नवीन लेखन...

कवी अरुण म्हात्रे

कवी, गीतकार आणि निवेदक अरुण म्हात्रे यांचा जन्म २५ ऑक्टोबर १९५४ रोजी झाला.

अरुण म्हात्रे हे प्रामुख्याने गेय कविता लिहिणारे कवी म्हणून प्रसिद्ध आहेत. प्रेमातली आर्तता, विव्हलता, अगतिकता अत्यंत प्रभावीपणे मांडणाऱ्या कविता हे त्यांचं वैशिष्ट्य.

अरुण म्हात्रेंचं व्यक्तिमत्व बहुआयामी आहे. कॉमर्सचे पदवीधर झाल्यावर त्यांनी अकाउंटन्सीची कामं केली. काही दिवस प्राध्यापकी केली. नाटकं दिग्दर्शित केली. संगीताचे कार्यक्रम केले. अनेक सामाजिक मोर्चांमध्ये भाग घेतला. काही आंदोलनांत कारावाससुद्धा भोगला.

कविता सामान्य लोकांपर्यंत पोहोचावी आणि कवितेविषयी लोकांच्या मनांत आवड उत्पन्न व्हावी या हेतूने अरुण म्हात्रे यांनी आपल्या सहा कवी मित्रांसह ‘कवितांच्या गावा जावे’ या रसिल्या मैफलीचे गावोगावी जाऊन सादरीकरण करायला सुरुवात केली आणि पाहतापाहता तो कार्यक्रम लोकप्रिय झाला होता.

महाराष्ट्रातल्या अगदी आडगावीसुद्धा कविता पोहोचवण्याचं श्रेय अरुण म्हात्रे यांच्याकडे जातं.

त्यांना बहिणाबाई पुरस्कार, वासंती गाडगीळ पुरस्कार, स्नेहदा चषक- अशा पुरस्कारांनी सन्मानित करण्यात आलं आहे. कोकण मराठी साहित्य परिषदेतर्फे दिला जाणारा मानाचा कविता राजधानी पुरस्कार अरुण म्हात्रे यांना  मिळाला आहे.

ऋतू शहरातले, ते दिवस आता कुठे?, कोसो मैल दूर आहे चांदणी – अशी त्यांची पुस्तकं प्रसिद्ध आहेत.

— संजीव वेलणकर.

९४२२३०१७३३

पुणे.

संजीव वेलणकर
About संजीव वेलणकर 4354 Articles
श्री. संजीव वेलणकर हे पुणे येथील केटरिंग व्यवसायिक असून ते विविध विषयांवर सोशल मिडियामध्ये लेखन करतात. ते १०० हून जास्त WhatsApp ग्रुप्सचे Admin आहेत. संगीत, आरोग्य, व्यक्तिचित्रे, पाककृती व इतर दिन विशेष या विषयांवर फेसबुकवर ही ते नियमितपणे लेखन करत असतात.
Contact: Facebook

Be the first to comment

Leave a Reply

Your email address will not be published.


*


महासिटीज…..ओळख महाराष्ट्राची

रायगडमधली कलिंगडं

महाराष्ट्रात आणि विशेषतः कोकणामध्ये भात पिकाच्या कापणीनंतर जेथे हमखास पाण्याची ...

मलंगगड

ठाणे जिल्ह्यात कल्याण पासून 16 किलोमीटर अंतरावर असणारा श्री मलंग ...

टिटवाळ्याचा महागणपती

मुंबईतील सिद्धिविनायक अप्पा महाराष्ट्रातील अष्टविनायकांप्रमाणेच ठाणे जिल्ह्यातील येथील महागणपती ची ...

येऊर

मुंबई-ठाण्यासारख्या मोठ्या शहरालगत बोरीवली सेम एवढे मोठे जंगल हे जगातील ...

Loading…

error: या साईटवरील लेख कॉपी-पेस्ट करता येत नाहीत..