हा सण बैलांविषयी कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी श्रावण महिन्यातील अमावस्येला केला जातो. यालाच बेंदूर असेही नांव आहे. देशपरत्वे काही ठिकाणी आषाढ, भाद्रपद अमावस्येला हा सण केला जातो. पेरण्या संपलेल्या असतात, शेतीच्या कामातून बैल रिकामे झालेले असतात. अशा वेळी बैलांना न्हाऊ- माखू घालतात. आरती ओवाळतात. त्यांना पुरणपोळीचा नैवेद्य अर्पण करतात. दुपारी त्यांना सजवून गावातून वाजत-गाजत मिरवणूक काढतात. यात बैलांविषयी कृतज्ञता व्यक्त होते.
-श्री करंदीकर गुरुजी
Leave a Reply