साधारण १९६० ते ६५ च्या दरम्यान दक्षिण भारतातील Andhra Pradesh मध्ये बड्या जमीनदारान विरुद्ध माओ वादी संघटनेने जबरदस्त आंदोलन उभारले, प्रथम सामान्य जनतेची सहानभूती मिळत होती, त्यातून जहाल नक्षलवादी उदयास आले ,ज्यांनी जमीनदारांचे अमानुष पद्धतीने खून केले.राज्यात दहशतवाद फोफावत गेला.या चळवलीचा प्रमुख होता, गणपती,इंजीनियर झालेला हा तडफदार तरुण आपले घरदार सोडून या चळवळीचा प्रमुख झाला , गेल्या ३० वर्षात तो एकदाही घरी आला नाही, तो भूमिगत असून तो कुठून काम करतो याचा ठाव ठिकाणा माहीत नाही, बहुदा तो जिवंत असावा.त्यंनी केलेल्या अनेक घातपाती कृत्या मुळे त्याच्या नातेवाईक मंडळीनच्या मागे पोलीस यंत्रणेचा कायमचा ससेमीरा आहे.त्यांचे जीवन कारण नसताना खडतर बनलेले आहे.
शिव खेर या प्रसिद्ध विचारवंताने म्हटले आहे,”जे वाईट प्रवृत्तीचे लोक आहेत ते मूठभरच आहेत पण चांगले लोक एकत्रित होऊ शकत नाहीत किंवा निष्क्रीय राहतात,म्हणूनच ते मुठभर त्यांच्यावर अंकुश ठेवतात.
नक्षलवादिना नामोहरण करण्याचे उद्दिष्ट ठेऊन आंध्रप्रदेश पोलीस विभागाने एक जबरदस्त GREY HOUND FORCE तयार केला. ज्याला केंद्र सरकारने मान्यता दिली व भरपूर अर्थ सहाय्य दिले आहे.हैद्राबाद येथे या पोलीस फोर्सच्या जवानांना अतिशय खडतर व जीवघेणे प्रशीक्षण देण्यात येते.जंगलात एकट्याने अनेक दिवस कसे राहायचे, आपला मार्ग शोधायचा,वेळ आल्यास जिवंत सरपटणारे प्राणी मारून पोट भरायचे,त्या भागातील आदिवासींची बोली भाषा शिकायची,ही सर्व तयारी झाल्यावर आदिवासींचा वेष करून नक्षलवादी ज्या जंगलात वास्तव्य करतात, त्या बाजूच्या खेड्यात वास्तव्याला जायचे,काही काळ अशा खेड्यात राहून नक्षलवादी बरोबर संगनमत करायचे,आणी गुप्त पणे एका रात्रीत त्यांचे तळ उध्वस्त करायचे व दुसर्या भागात पलायन करायचे,या मोहिमांची गुप्तता इतकी, की त्या भागातील पोलीसानाही त्याची खबर नसते.या मोहिमांचा गुप्तता हेच त्यांचे यश आहे.याचे शिक्षण घेण्यास भारतातील अनेक प्रांतातून जवान शिक्षण घेण्यास येत असतात.
Andhra Pradesh मधून नक्षलवादिंचे जवळ जवळ पूर्णपणी उच्चाटन करण्यात यश आलेले आहे,हा फोर्स आशेचा किरण आहे.
छ,ग,ची बस्तरिया बटालीयन :-
Central reserve police force(CRPF ) यांच्या मदतीने नक्षली बरोबर गनिमी युद्ध करण्याचे शिक्षण देण्याची ACAKADAMY Ambikapur या बस्तर मधील गावात काढण्यात आलेली आहे.त्याला नाव आहे २४१ बस्तरीया बटालीयन ,या मध्ये मुख्यता ४ जिल्ह्यातील आदीवासी तरुण मुले व मुलींची भरती करण्यात आलेली आहे.या मध्ये १/३ महिला आहेत.या सर्वाना ४५ दिवसाचे जंगलातील गनिमी युद्धाचे अतिशय खडतर पद्धतीचे शिक्षण देण्यात येते.
नक्षली विरुद्ध लढण्याकरता संपूर्ण भारतातून SRP च्या अनेक बटालीयनस विविध भाषा बोलणारे असल्याने येथील आदिवासी बरोबर संवाद साधणे अशक्य होते, जंगलातील पाउलवाटा व खेडी याची सखोल माहिती त्यांना नसल्याने त्यांच्या मोहिमा फसतात.बस्तरिया बटालियनला या परिसराचे पूर्ण माहिती व बोली भाषेचा उपयोग ,त्यामुळे यांना मदतीला घेऊन मोहीमा यशस्वी होत आहेत.
१२ वर्षापूर्वी आदिवासी तरुणांना एकत्रित करून त्यांना गनिमी लढाईचे शिक्षण देण्यां आले होते. सलवा जुडूम या नावाने ओळखली जाणारी ही सेना सरकारच्या संमतीने उभारली गेली, पण ही सर्व योजनाच अपयशी ठरली.त्या वेळी congress चे सरकार होते, त्यातील काही पुढार्यांच्या हत्या नक्षलीनी केल्या, सेनेतील काही तरुणांना पकडून त्यांचे हालहाल करून मारून टाकण्यात आले.उरलेले इतर राज्यात पळून गेले तेथे बेवारशी म्हणून जगत आहेत.बस्तरीया बटालीयन बांधणीचा ढाचा वेगळाच असून त्यात बरीच गुप्तता आहे त्यामुळे ते नक्षलींचा बीमोड करू शकतील असा सरकारला विश्वास आहे.
नक्षलींचा नेमका वेध :-
घनघोर पावसात सुकमा जिल्ह्यातील घनदाट जंगलात निर्णायक विजय मिळविण्याचे जिकरीचे कार्य केंद्रीय सुरक्षा दलाच्या जवानांनी जूलै २०१८ करून ८६ नक्षलीना ठार मारून निर्णायक यश मिळविले आहे.देशाच्या इतर भागात २०० नक्षली मारले गेले आहेत.नक्षली पावसाळ्यात दुर्गम प्रदेशात नवीन भरती नक्षलीची शिबिरे घेतात.यात भाग घेणारे जनामिलीशीया दलाचे सदस्य असतात.त्यांच्या गाठीला फारसा अनुभव नसतोच, त्यांचा बेस फोर्स म्हणून उपयोग केला जातो.त्यांना साध्या बंदुका दिल्या जातात, सामान वाहून नेणे व त्यांचा ढाली सारखा उपयोग सर्वात वरच्या श्रेणीचे कमांडो आपल्या रक्षणा साठी करतात..आता या सर्वांची अचूक माहिती मिळण्याचे तंत्रज्ञान अवगत केल्याने या सर्व फोर्सला नक्षलीन ठार मारण्यात यश मिळत आहे.या युद्धा बरोबर विकासाचा समान वाटा आदिवासी पर्यंत पोहचण्याची नितांत गरज आहे.
माओवादाचे प्रचार तंत्र :-
शत्रूला म्हणजे संपूर्ण सरकारी यंत्रणेला नामोहरण करण्याचे शस्त्र आहे 4 th generation warfare where enemy can’t be traced. सामान्य जनते मध्ये खोटा प्रचार प्रसार माध्यमांचा उपयोग करून संपूर्ण यंत्रणेला वेठीस धरायचे, त्या करता मानवी अधिकाराचा उपयोग,कोर्टात खोट्या केसेस दाखल करणे, खोट्या चौकशी करण्याचा प्रयत्न करणे, ज्यामुळे समाजाची दिशाभूल होते.
हे काम दोन पातळीवर चालते.
१) united front:- शहरात विविध संघटना ताब्यात घेणे,कोर्टात दावे लढविण्यासाठी भरपूर पैसे देऊन वकीलांची फौज तयार करणे, असे अनेक वकील नागपूर, बिलासपुर, चन्द्रपूर कोर्टात केसेस माओवादीच्या बाजूनी लढतात, काही तर परदेश पर्यटन करून तेथील माओवादीना भेटतात. खोटे मोर्चे काढणे पोलीसांना खोटी माहिती पुरवून दिशाभूल करणे, मोर्च्यातील योग्य व्यक्तीला हेरून त्याला दहशतवादी तळाचा मार्ग दाखवणे ( पैशाचे आमिष दाखून )
२) Armed Front:- बंदुक व बॉम्बस्फोट याच्या जोरावर छुपे युद्ध करणे
माआ चे प्रसिद्ध वाक्य आहे .”समाजाचे कान व डोळे बंद करा,कर्ण भोंग्यातून खोटा प्रचार करा, आणी गोंधळ माजवा. Perception War make as confusion War
या चळवळीना लागणारा पैसा भारत भरातील अनेक इंजिनियर कंपनी फंडातून पाठवितात. शिवाय दमदाटीने आदिवासी कडून राजरोस चालणारी कर वसुली, बस्तर मधील कंपन्या कडून वसूल केलेली खंडणी या सर्वांच्या जोरावर समांतर सरकारच चालविले जाते.
— डॉ. अविनाश वैद्य.
Leave a Reply