नवीन लेखन...

राजकीय पुढारी मुकुंद जयकर

लेखक, विधिज्ञ, राजकीय पुढारी, वक्ते आणि पुणे विद्यापीठाचे कुलगुरु बॅरिस्टर मुकुंद जयकर यांचा जन्म १३ नोव्हेंबर १८७३ रोजी मुंबईत झाला.

Mukund Ramrao Jayakar - Person - National Portrait Galleryमुकुंद रामराव जयकर यांचा पुणे करारावर स्वाक्षऱ्या करणाऱ्या नेत्यांमध्ये समावेश होता. जयकरांचा जन्म एका मध्यमवर्गीय कुटुंबात झाला. त्यांनी मुंबईतील एल्फिन्स्टन विद्यालय व सेंट झेवियर महाविद्यालय यांतून शिक्षण घेतले. मुंबई विद्यापीठाच्या अनेक पदव्या त्यांनी संपादन केल्या. वयाच्या चोविसाव्या वर्षी इंग्लंडला जाऊन ते बॅरिस्टर झाले आणि मुंबई उच्च न्यायालयात कायदेपटू म्हणून प्रसिद्धीस आले. १९१९ साली पंजाबमध्ये झालेल्या हत्याकांडाची चौकशी करण्याकरता काँग्रेसने जी एक समिती नेमली होती, तिचे ते सदस्य होते. त्यांनी स्वातंत्र्याच्या चळवळीत सक्रिय असा भाग घेतला नाही; तरीही राजकीय वाटाघाटीत मध्यस्थ म्हणून ते यशस्वी ठरले. या दृष्टीने ’गांधी–आयर्विन करार (१९३१” आणि ’पुणे करार (१९३२)’ या बाबतींत त्यांची कामगिरी उल्लेखनीय आहे.

वकील म्हणून त्यांनी भरपूर पैसे मिळविले. त्यांतून त्यांनी अनेक संस्थांना देणग्या दिल्या. त्यांनी टिळक स्वराज्य फंडालाही मोठी देणगी दिली होती. प्रथम ते स्वराज्य पक्षात होते. नंतर त्यांनी केळकर प्रभृतींबरोबर प्रतिसहकार पक्ष काढला. ते प्रिव्ही कौन्सिल व फेडरल कोर्टातही न्यायाधीश झाले. तिन्ही गोलमेज परिषदांचे ते सभासद होते. त्यांना पुढे संविधान समितीचे सभासद म्हणून घेतले; पण फार दिवस ते काम त्यांनी केले नाही.

मुंबईच्या विधिमंडळात त्यांनी १९२३–२६ च्या दरम्यान स्वराज्य पक्षाचे नेतृत्व केले. पुढे ते मध्यवर्ती विधिमंडळात राष्ट्रीय पक्षाचे उपनेते होते (१९२६–३०). आयुष्याच्या अखेरच्या दिवसांतील पुणे विद्यापीठाची स्थापना, ही त्यांची महत्त्वाची कामगिरी होय. ते पुणे विद्यापीठाचे पहिले कुलगुरू होते.

वकिलीच्या धंद्यात त्यांना अतोनात पैसा मिळाला. त्यांपैकी दोन लाख रुपये त्यांनी शैक्षणिक, सामाजिक आणि सांस्कृतिक क्षेत्रांत काम करणाऱ्या संस्थांना देणगीरूपाने दिले.

’स्टडीज इन वेदान्त’ या इंग्रजी पुस्तकाचे जयकरांनी संपादन केले. त्यांचे हिंदू धर्माविषयीचे विचार त्यांनी ’मराठी मंदिर’ या नियतकालिकातील लेखांद्वारे प्रकाशित केले.

पुणे येथे १९१८ साली भरलेल्या १४ व्या मराठी नाट्यसंमेलनाचे अध्यक्षपद बॅ.मुकुंदराव जयकरांनी भूषविले होते. २३ एप्रिल १९२३ रोजी गुलबर्गा येथे झालेल्या हैदराबाद सामाजिक सुधार संघाच्या अध्यक्षस्थानी होते.

मुकुंद रामराव जयकर यांचे निधन १० मार्च १९५९ रोजी झाले.

— संजीव वेलणकर.

९४२२३०१७३३

पुणे.

संजीव वेलणकर
About संजीव वेलणकर 4354 Articles
श्री. संजीव वेलणकर हे पुणे येथील केटरिंग व्यवसायिक असून ते विविध विषयांवर सोशल मिडियामध्ये लेखन करतात. ते १०० हून जास्त WhatsApp ग्रुप्सचे Admin आहेत. संगीत, आरोग्य, व्यक्तिचित्रे, पाककृती व इतर दिन विशेष या विषयांवर फेसबुकवर ही ते नियमितपणे लेखन करत असतात.
Contact: Facebook

Be the first to comment

Leave a Reply

Your email address will not be published.


*


महासिटीज…..ओळख महाराष्ट्राची

रायगडमधली कलिंगडं

महाराष्ट्रात आणि विशेषतः कोकणामध्ये भात पिकाच्या कापणीनंतर जेथे हमखास पाण्याची ...

मलंगगड

ठाणे जिल्ह्यात कल्याण पासून 16 किलोमीटर अंतरावर असणारा श्री मलंग ...

टिटवाळ्याचा महागणपती

मुंबईतील सिद्धिविनायक अप्पा महाराष्ट्रातील अष्टविनायकांप्रमाणेच ठाणे जिल्ह्यातील येथील महागणपती ची ...

येऊर

मुंबई-ठाण्यासारख्या मोठ्या शहरालगत बोरीवली सेम एवढे मोठे जंगल हे जगातील ...

Loading…

error: या साईटवरील लेख कॉपी-पेस्ट करता येत नाहीत..