एक लहानसे फळ. ते फोडले तर लालचुटूक दाणे पाहूनत्या लाल रंगाने कोणीही भारावून जाते. ही सगळी निसर्गाची किमया. डाळींब आले कुठून आले. पण आयुर्वेदशास्त्रानुसार डाळींब हे हिमालयाच्या पायथ्याशी वाढते, असे म्हटले आहे. डाळींब हे एक अत्यंत पौष्टीक तसेच जीवनसत्त्वे, प्रथिने अथवा खनिज द्रव्ये यांनी भरलेले असते. तसेच यात एनर्जी म्हणजे शक्तीदेखील प्रचंड मोठ्या प्रमाणात असते.
डाळींब हे जसे हिमालयात वाढते ते तसेच इराण, अझरबैजान, अरेमिया, अफगाणिस्तान तसेच युरोप पासून आफ्रिकेपर्यंत याची पैदास होते. तसेच ते आता अमेरिकेतही आढळते. डाळींब हे अनेक प्रकारे औषध म्हणून घेतले जातात. अमेरिकेने या विषयावर खूप प्रमाणात संशोधन केले. जर एखाद्यास रक्त कमी पडत असल्यास त्यात डाळींबाने एकदम फरक पडतो. म्हणजेच रक्तशुद्धी फार लवकर होते. डाळींब हे कोलेस्टेरॉलवर अतिशय उत्तम औषध आहे. डाळिंबाचा रस घेण्यापेक्षा ते आतल्या बिया चावून खाल्ल्यास त्याचा चांगला उपयोग होतो. तसेच जर रक्तदाब (ब्लडप्रेशर) वाढत असल्यास सतत डाळींब खाणे उपयोगी पडते. तसेच यात लॅक्टीक अॅसिड असल्यामुळे पोटातील सूक्ष्म जंतू विरघळून जातात. डाळिंबातील रसच नव्हे तर आतील बियादेखील औषधी असतात. या बियामुळे अपचनाचा त्रास थांबून पोट साफ होते.
– मदन देशपांडे
Leave a Reply