एक वाक्य लिहिलं की पुर्णविराम देतो.
दुसरं तिसरं वाक्य लिहून झालं की
पुन्हा पूर्णविराम.
अजून काही वाक्ये लिहत राहतो.
पुर्णविराम देत देत.
सगळं लिखाण संपतं पुर्णविरामानं.
तरीही काही आठवलं की
ताजाकलम म्हणून अजून वाढवत राहतो लिखाण.
पुर्णविराम देवुन पुन्हा.
या अपुर्णविरामांना दुसरं नाव शोधतोय मी.
मधल्या सगळ्या पुर्णविरामाच्या टिंबाला वेगळं अन
शेवटच्या खरोखरच्या पुर्णविरामाच्या चिन्हाचा
आकारच वाढवावा म्हणतो मी ॰
— श्रीकांत पेटकर
Leave a Reply