आपल्या शरीरात बिघाड होतो त्यामुळे एखादी व्याधी उत्पन्न होते. कधीकधी आयुष्यात सतत अडचणी, त्रास आणि समस्या यांच्या मालिकाच निर्माण होतात. मग हे दोन्ही प्रकारचे म्हणजे शारीरिक आणि मानसिक त्रास घालविण्यासाठी आपण आपल्या विचारात योग्य बदल करुन सुधारू शकतो का ?
याचं उत्तर ‘होय ‘ असं द्यायला काहीच हरकत नाही. कारण मानसिक स्वास्थ बिघडलं तर त्यातून शारीरिक व्याधी निर्माण होतात जसे मधुमेह, उच्च रक्तदाब वगैरे.
विचारांचा नकारात्मक ताण न घेता सकारात्मक विचारांचे प्रमाण वाढवले तर हे रोग उद्भवण्याचे मूळच नष्ट होते. आणि तुम्ही कोणाचं वाईट केलं नाही, वाईट चिंतिलं नाही, सदैव नकारात्मकतेकडे दुर्लक्ष करून सकारात्मक राहिलात तर समस्या व्हायचं कारणच नाही
आणि तरिही काही अन्य कारणाने समस्या उद्भवल्या असतील तर तुमच्या सकारात्मक नैतिक बळापुढे त्या टिकाव धरू शकणार नाहीत.
Leave a Reply