हा लेख ग्वाल्हेर, मध्य प्रदेश स्थित श्री रामचंद्र किल्लेदार यांनी लिहिला आहे. मध्यप्रदेशातील वास्तव्यामुळे भाषा थोडी हिंदीमिश्रीत आहे. मराठीसृष्टीच्या संपादकीय धोरणाप्रमाणे ती तशीच ठेवली आहे.
फरवरी शेवट, मार्च च्या तिसऱ्या आठवडया पासुन ” कोरोना” महामारी आल्याने आणि तिच्यापासुन बचावासाठी ” लॉक डाउन” लावावा लागला. सर्व जण घरात बंदी झाल्या गत झाले पण चांगल्या करिता . उद्योग-धंदे, थियेटर,बाजार,मॉल बैंद केले गेले . आता एवढं सर्व बंद झाले तेव्हा लॉक डाउन चा असर साहित्यक्षेत्रात ही पड़नाराच होता.
लाकडाउन मुळे कवितेचे, कथाकथनाचे, गायनाचे कार्यक्रम रद्द करावे लागले. पहिल्या लाकडाउन मधे म्हणजे मार्च शेवट पर्यन्त सर्व जण समझू शकले नाही ह्यातून कस बह पडायच किव्हा कसा मार्ग शोधायचा . पण साहित्यिक मन आणि व्यक्ति आनिबाणीच्या वेळी सुद्धा धीर सोडत नाही. साहित्याचे सृजन चालूच असते .
आजच्या काळात विज्ञानाची प्रगति खुप झालेली आहे.सोशल- मीडिया, फेसबुक, व्हाट्सएप हे अंतरजाळनी खूप सोई करून दिल्या आहे. कोणी दोन व्यक्ति किव्हा दोन पेक्षा जास्त व्यक्ति सुद्धा अंतरजाळ चा वापर करून एक जागी येऊ शकतात आणि कोणता समारम्भ, काव्य सम्मेलन मधे त्यांची हजेरी लाउ शकतात . सगळे एकमेकाला बघू शकतात, एकून प्रतिक्रिया त्याच वेळी दाखवू शकतात . म्हणून ऑनलाइन कवि सम्मेलन, कथाकथनाचे समारम्भ यशस्वी पणे होउ लागले. ह्या उपाया मुळे कवि , कथाकार,गायक , प्रवचनकार आणि आयोजकांची अड़चन दूर झाली. ह्या सर्वाना लॉक डाउन चा काळ वरदान वाटू लागला. पूर्वी पण फेसबुक मुळे , यू ट्यूब मुळे लाइव होता येत होतं पण त्याचा वापर कमी कलाकार करत होते. काव्य सम्मेलन कमीच ऑनलाइन व्हायचे .
लॉक डाउन मुळे प्रकाशन व्यवसायावर आणि प्रकाशित पुस्तका, काव्य संग्रह, कथासंग्रह वर चांगलाच परिणाम होणार आहे आणि झाला पण आहे. काहिं मासिकां च्या आवृत्या ज्या वर्षोपासुन नियमित निघायच्या त्यात खंड पडला. पण जे वेब मासिक निघत होते त्यांच्यावर असर झाला नाही.
आता जरी पुस्तक प्रकाशन व्यवसायावर असर झाला असला तरी भविष्य चांगले आहे कारण पुस्तकरुपात — काव्य संग्रह, कथासंग्रह दर वेळेस जवळ असतो, कधी सुद्धा , किती वेळा वाचता येतो . पुस्तक (हार्डकॉपी) कोणालाही भेट केल जाऊ शकतं . लॉक डाउन नंतर सर्व काहिं सुरळीत होईल , हीच आशा बाळगु शकतो. थोड़ा काळ लागेल एक – दोन वर्ष पण लागू शकतात.
# रामचन्द्र किल्लेदार,
गवाल्हेर, म.प्र.
Leave a Reply