नवीन लेखन...

निवृत्ती नंतरच्या व्यथा !

हरि ॐ

सगळयाच निवृत्तीधारकांसं निवृत्ती नंतर काही दिवस व महिने बरे वाटते कारण रोजच्या धकाधकीच्या घाईगर्दी व लोटालोटीचा ट्रेनचा प्रवास सरलेला असतो. मुख्य म्हणजे मस्टर नसते त्यात पुरूषांना सकाळी आरामात ऊठता येते त्यामुळे वेळ बरा जातो. काही जणांची नोकरी व्यवसायात मिळणारी चिरीमीरी

बंद झाल्याने आर्थिक तंगी असते. कुटुंबाची आर्थिक ओढाताण व्यसनं व नसत्या गरजा पैशा विना कशा पुर्‍या करायच्या हे प्रश्न मनात सतावत असतात. तसेच मानाची खुर्ची व पद नसल्याने सगळी कामे स्वतःहून करणे क्रमप्राप्त असते आणि हेच कुठेतरी खटकतं म्हणून निवृत्ती नको असते. निवृत्तीपासूनच निवृत्त असा पृथ्वीतलावर एकच अपवाद असेल तो म्हणजे राजकारणी !

सध्याच्या प्रगत युगात स्त्री पुरूषांच्या खांद्याला खांदा लाऊन सर्वच क्षेत्रात अग्रेसर आहे. परंतु स्त्रीयांच्या चित्तवृत्तीत निवृत्ती नंतर जरा बदललेला आढळतो. कारण स्त्रीला निसर्गता व वांशीक श्रद्धा सबुरी चिकाटी जिद्द व सोशीकपणाचे बाळकडू आईच्या उदरात मिळालेलं असतं. आणि म्हणूनच निवृत्ती नंतर काय हा प्रश्न तिच्या समोर एवढा गंभीर बनत नाही जेवढा पुरूषाला सतावतो. पण हे प्रमाण नेहमीच सर्वच स्त्रीयांच्या बाबतीत सारखं असत असं नाही. काही काळाची हाजीजी करतात तर काही काळाला बिनधास्त सामोरे जातात. असो…….

आजच्या विस्कटलेल्या अर्थकारणाचे बदललेले अंकगणित आणि अनिश्चित काळाची भूमिती तसेच इतिहास व भुगोल आजच्या युगात कोणाला कधी व केव्हां किंवा अचानक नोकरी व्यवसायातून कुठल्या कारणाने निवृत्त व्हावयास लावेल हे सांगता येत नाही. निवृत्त झाल्या नंतर काय हा मोठा यक्ष प्रश्न बर्‍याच निवृत्तीदारांपूढे ऊभा असतो. कारण इतके दिवस कामात व व्यवसायात रत असल्याने वेळ कसा जात होता हे कळत सुद्धा नव्हत. पण आत्ता तसे नाही. याला कारणे अनेक आहेत.

जीवनात धैयाचा अभाव लहान वयात एखादी कला न जोपासणे खेळांची किंवा वाचण्याची आवड नसणे वाईट सवयी जोपासणे जनसंपर्क कमी असणे सामाजिक कार्याची आवड नसणे न्युनगंड व आत्मगंड असणे सकारात्मक मानसिकता नसणे कुपमंडीत वृत्ती असणे वाईटांच्या संगतीत राहाणे आणि मुख्य म्हणजे स्वतःवरील व इश्वरावरील विश्वासाचा अभाव. त्यातच विचारांचे काहूर माजते व एखादा आजार बळावतो आणि असलेलं मनोधैर्य गळून पडतं आणि काही करू नये असे वाटावयास लागतं.

या व अशा अनेक कारणांसाठी निवृत्त व्यक्ती या दिवसाला भित असतो. ते वास्तव त्याला पटत नाही व पचतही नाही आणि वेळ घालवण्यासाठी नको त्या मित्रांची संगत धरतो आणि नको त्या व्यसनाच्या आहारी जातो. निवृत्ती नंतर मिळालेल्या शिधोरीला वेगळया वाटा फुटतात कुटुंबात ताणतणाव बेबनाव व सरते शेवटी स्वतःसह कुटुंबाची वास्लात लागते.

निवृत्ती नंतर काय या प्रश्नाचे उत्तर शोधण्यासाठी त्याचे नियोजन निवृत्ती पूर्वी करण्याचा प्रयास असावा. सगळी सोंग आणता येतील पण वेळ व पैशाचे सोंग आणता येणार नाही. त्यासाठी नोकरी व्यवसायात असतानाच वेळेचा व पैशाच अपव्यय न करता तो कसा भविष्यात उपयोगात आणता येईल याचे विश्वासू व लायक तज्ञांनकडून योग्य मार्गदर्शन घ्यावे. आपल्या आजुबाजूच्या निवृत्त झालेल्या वडीलधार्‍या व्यक्तींचे चांगले आदर्श डोळया समोर ठेवावेत व तसे वागण्याचा आपला प्रयत्न असावा. यामुळे निवृत्ती ही समस्या न राहाता त्याला सामोरे जाण्यास काही अडचणी येणार नाहीत किंवा ती मोठी व गंभीरबाब राहाणार नाही. इतर अनेक गरजां प्रमाणे ती एक काळाची गरज होईल व त्यात गुंतून न राहाता निवृत्तीला समर्थपणे तोंड देता येईल व त्याने चांगला समाज घडेल.

पण एका गोष्टीतून निवृत्त होणे मन व बुद्धीला सोसणारे रूचणारे व परवडणारे असणार नाही ते म्हणजे परमेश्वरावरील भक्तीतून. हीच भक्ती व सेवा निवृत्ती पूर्वी आणि नंतर सतत आपल्याला तारणार आहे. जीवनाच्या अंता पर्यंत व त्या नंतरही.

जगदीश पटवर्धन वझिरा बोरिवली (प.)

— जगदीश पटवर्धन

जगदीश अनंत पटवर्धन
About जगदीश अनंत पटवर्धन 227 Articles
एम.कॉम. एल.एल.बी. असलेले श्री पटवर्धन हे एक बहुआयामी व्यक्तिमत्त्व आहे. चित्रकला, तबला वादन, क्रिकेट, टेबल टेनिस शास्त्रीय संगीत ऐकण्याची त्यांना आवड आहे. त्यांनी अनेकविध विषयांवर आजपर्यंत लेखन केले आहे.

Be the first to comment

Leave a Reply

Your email address will not be published.


*


महासिटीज…..ओळख महाराष्ट्राची

गडचिरोली जिल्ह्यातील आदिवासींचे ‘ढोल’ नृत्य

गडचिरोली जिल्ह्यातील आदिवासींचे

राज्यातील गडचिरोली जिल्ह्यात आदिवासी लोकांचे 'ढोल' हे आवडीचे नृत्य आहे ...

अहमदनगर जिल्ह्यातील कर्जत

अहमदनगर जिल्ह्यातील कर्जत

अहमदनगर शहरापासून ते ७५ किलोमीटरवर वसलेले असून रेहकुरी हे काळविटांसाठी ...

विदर्भ जिल्हयातील मुख्यालय अकोला

विदर्भ जिल्हयातील मुख्यालय अकोला

अकोला या शहरात मोठी धान्य बाजारपेठ असून, अनेक ऑईल मिल ...

अहमदपूर – लातूर जिल्ह्यातील महत्त्वाचे शहर

अहमदपूर - लातूर जिल्ह्यातील महत्त्वाचे शहर

अहमदपूर हे लातूर जिल्ह्यातील एक महत्त्वाचे शहर आहे. येथून जवळच ...

Loading…

error: या साईटवरील लेख कॉपी-पेस्ट करता येत नाहीत..