

कधी कधी ती सांगेल तसंच मुद्दाम लिहायचो….त्यात बदल करुन लिहायचं असायचं..पण तसं न करता…तिची वाक्यं तश्शीच लिहायचो….आजीच्या नंतर ते लक्षात आलं होतं..मग ती वाचायला सांगायची..,आणि आमची लबाडी उघडकीस यायची…(आम्ही लिहिताना ती जसं बोलली तसंच लिहायचो…म्हणावं. असं करु नकोस,म्हणावं नीट वागत जा….वगैरेवगैरे…) पण वाचून दाखवताना आमचीच गल्लत व्हायची ..त्यामुळे आजीला ते कळायचं……
हे मी घरी माझ्या पतीला सांगितलं तेव्हां मला आठवतं, माझ्या पतीने मला सांगितलं ..आता तू ही लॅपटाॅप, कंप्युटर शिकून घे नाहीतर तुझीही अवस्था तुझ्या आजीसारखीच होईल., आपली कामं करुन देण्यास तरुण मुलांना विनंत्या कराव्या लागतील, आणि जाणवलं, खरंच की, आपली अवस्थाही आपल्या आजीसारखीच होईल तेव्हां शिकून घेणं अत्यंत आवश्यक आहे. माणसाला काळाप्रमाणे बदलावं, शिकावं लागतंच..
त्याशिवाय गत्यंतर नाही. हो, याची मजा वेगळीच ..आज शिकतिना तरुणांची खरोखरच खूप मदत होते. ही मजा वेगळी आहे आणि कार्डाची वेगळी.,
…असे ते कार्डाचे दिवस…
-–देवकी वालावदे
Leave a Reply