नवीन लेखन...

पोटाचा घेर कमी करायचाय?

[embedyt] https://www.youtube.com/watch?v=wtutnEth2og[/embedyt]

जगातील प्रत्येक व्यक्ती आपले आरोग्य उत्तम असावे अशीच इच्छा मनोमन बाळगून असते. चांगल्या आरोग्यासाठी शरीरातील मेदाचे म्हणजेच चरबीचे प्रमाण आटोक्यात असणे आवश्यक आहे. व्यक्तीच्या सर्व रोगांचे मूळ अनावश्यक चरबीत आहे, हे संशोधनाअंती सिद्ध झाले आहे. मधुमेह, रक्तदाब, पक्षाघात, कॅन्सर यांची सुरुवात चरबी जास्त असण्यातून होणे शक्य असते. महिलांमध्ये पी.सी.ओ.डी. (पॉलिसिस्टिक ओव्हरियन डिसिझ), वंध्यत्व, पाळीचे त्रास, गर्भाशयात गाठी यांचीही सुरुवात मेदाचे प्रमाण जास्त असल्यामुळेच होते असे सप्रमाण सिद्ध झाले आहे. ज्यांचे चरबीचे, मेदाचे प्रमाण पोटाच्या व ओटीपोटाच्या भागात जास्त असते त्यांना जास्त धोका असतो.

वाढणाऱ्या पोटाची समस्या सर्वानाच सतावत असते. आहारावरील नियंत्रण आणि व्यायामाची जोड असेल तर पोटावरील घेरा कमी करणे सहज शक्य आहे. धावणे, पोहणे, चालणे यांसारख्या व्यायाम प्रकाराने शरीरातील उष्मांक कमी करणे शक्य आहे. मात्र वेगाने पोटाचा घेरा कमी करण्यासाठी काही योगासने आणि व्यायामांचे प्रकार केल्यास फरक पडू शकतो. मात्र शरीरातील अतिरिक्त चरबी कमी करण्यासाठी केवळ व्यायाम पुरेसा नाही, तर व्यायामाबरोबर योग्य आहार असेल तर ध्येय तुमच्या अगदी जवळ आहे.

पोटाची चरबी कमी करायची असल्यास तुम्हाला प्रथम तुमच्या जगण्याची पध्दत बदलावी लागेल. कारण याच पध्दतीमुळे तुमचे वजन वाढत आहे, आणि पोटाचा आकारही. याच प्रकारची जीवन पध्दती तुमच्या या अवस्थेला कारणीभूत आहे. त्यामुळे जर तुम्हाला पोटाची चरबी कमी करून आपल्या शरीराला आकर्षक लुक द्यायचा असेल तर सोपे घरगुती उपाय नक्की करा. तुम्हाला याचा फायदा होईल. स्थूलता म्हणजे लठ्ठपणा किंवा वजन जास्त असणे. साधारणपणे यात शरीरातील चरबीचे प्रमाण जास्त असते. जगभर ही एक वाढती समस्या आहे. भारतातही शहरी विभागात याचे प्रमाण वाढत आहे. पूर्वी हा आजार प्रौढांमध्ये जास्त होता. आता मात्र लहान मुले, तरुण आणि वृध्द या सगळयांमध्येच त्याचे प्रमाण वाढत आहे. स्थूलता हा एक आजार आहे हे अद्याप कित्येक सुशिक्षित लोकांनाही समजलेले नाही. राहणीमानामुळे ग्रामीण भागात स्थूलतेचे प्रमाण कमी आहे. साधारणपणे 20 ते 40% प्रौढ आणि 10 ते 20% मुले आज शहरी भागात लठ्ठ आहेत.

Sanket

Sanket
About Sanket 72 Articles
संकेत प्रसादे हे एक प्रसिद्ध लेखक, ब्लॉगर, प्रशिक्षक, समुपदेशक आणि युटूबर आहेत. त्यांची आतापर्यंत २ पुस्तके प्रकाशित झाली आहेत. तसेच ते नवराष्ट्र ह्या दैनिकामध्ये मानसिक आणि शारीरिक आरोग्यासंबंधी लिखाण करतात. मानसिक आणि शारीरिक स्वास्थ्याबद्दल ते आपल्या लिखाणांमधून तसेच कार्यक्रमांमधून लोकांमध्ये जनजागृती निर्माण करतात.

Be the first to comment

Leave a Reply

Your email address will not be published.


*


महासिटीज…..ओळख महाराष्ट्राची

गडचिरोली जिल्ह्यातील आदिवासींचे ‘ढोल’ नृत्य

गडचिरोली जिल्ह्यातील आदिवासींचे

राज्यातील गडचिरोली जिल्ह्यात आदिवासी लोकांचे 'ढोल' हे आवडीचे नृत्य आहे ...

अहमदनगर जिल्ह्यातील कर्जत

अहमदनगर जिल्ह्यातील कर्जत

अहमदनगर शहरापासून ते ७५ किलोमीटरवर वसलेले असून रेहकुरी हे काळविटांसाठी ...

विदर्भ जिल्हयातील मुख्यालय अकोला

विदर्भ जिल्हयातील मुख्यालय अकोला

अकोला या शहरात मोठी धान्य बाजारपेठ असून, अनेक ऑईल मिल ...

अहमदपूर – लातूर जिल्ह्यातील महत्त्वाचे शहर

अहमदपूर - लातूर जिल्ह्यातील महत्त्वाचे शहर

अहमदपूर हे लातूर जिल्ह्यातील एक महत्त्वाचे शहर आहे. येथून जवळच ...

Loading…

error: या साईटवरील लेख कॉपी-पेस्ट करता येत नाहीत..