नवीन लेखन...

सुप्त मनाची अफाट शक्ति

power of subconscious mind

सोलोमन बेटावर आदिवासी जमातीचे वास्तव्य आहे. ते आदिवासी लोक प्रथेनुसार झाडे तोडणे अपशकुनी समजतात. एखादे झाड तोडायचे असेल तर एकत्र येऊन दररोज झाडाभोवती वर्तुळाकार तास न तास बसून झाडाला नकरात्मक लहरींनी (negative destructive frequency) घायाळ करतात. आश्चर्याचा भाग म्हणजे काही आठवड्यात ते झाड शुष्क होऊन उन्मळून पडते.

हे उदाहरण कोणालाही पचनी पडणे अवघड आहे. ते अविश्वसनीय वाटणे स्वाभाविक आहे. अदृश्य, न दिसणारे, नकारात्मक मन, चिन्तन करणारे विचार, एका झाडाचे अस्तित्व नष्ट करू शकतात का?

तुम्हाला जर ब्रुस लिप्टनचे पुस्तक The Biology of Belief वाचण्याची संधी मिळाली तर तुम्ही सोलोमन बेटावरील गोष्टच नव्हे तर तुम्ही तुमच्याबद्दल आणि ज्याच्यावर प्रेम करतात त्याच्या विषयी नकारात्मक बोलण्यावेळी हजार वेळेस विचार कराल.
लिप्टन यांनी या पुस्तकात जागृत (conscious) आणि सुप्त मनाच्या (subconscious mind) ताकदीवर विस्तृत विवेचन केले आहे.

सुप्त मनाची ताकद ही जागृत मनाच्या ताकदीपेक्षा दशलक्ष पटीने जास्त असते.
दैनंदिन जीवनात सुप्त मनाचा नकळत प्रचंड प्रभाव असतो. पुष्कळ वेळा आपण आपल्या वाईट सवयी अथक प्रयत्न आणि इच्छाशक्ति असताना सुद्धा सोडू शकत नाही. त्याचे मुख्य कारण ह्या वाईट सवयी सुप्त मनामध्ये प्रभावीपणे प्रोग्राम केल्या जातात आणि ते आपले सर्व प्रयत्न निष्क्रिय करतात.

जागृत मन (Conscious mind) ही सुप्त मनाची (Subconscious) केवळ सावली असते.
सोलोमन बेटावरील आदिवासी हे प्रभावीपणे नकारात्मक लहरींनी झाडाच्या संवेदनेवर (emotion) आघात करतात. झाडांना संवेदना असतात हे ही तितकेच खरे आहे.
काही दिवसांनी त्या आघाताने त्या संवेदना झाडाच्या एक अंगीभूत भाग होऊन जातात आणि त्यामुळे झाडाची अणुरचना ढासळते. झाड आतूनच मरणासन्न होते.

त्या पुस्तकात जागृत पालकत्वावर स्वतंत्र प्रकरण आहे. त्यात मुलावर सतत नकारात्मक बोलण्यामुळे, त्याच्या जडणघडणीवर विपरीत परिणाम होतात. याउलट सकारात्मक विचार, मुलाचे जीवनात उपयुक्त पडतात. तेच तेच सारखं बोलत राहणे सुप्त मनावर पगडा करते आणि तसेच घडत जाते याची प्रचिती दिसून येतेच.

म्हणूनच मी सुखी आहे, मी सर्व गुणसंपन्न आहे, माझ्याकडे भरपूर पैसा, उत्तम आरोग्य, उत्तम नाती, उच्चकोटीचा समाज, असे सर्वांगीण सुख स्मृद्धाने परिपुर्ण जीवन मी जगत. जे होत आहे आणि होणार आहे ते सर्व चांगलेच होणार आहे, असेच विचार मनात सतत असू द्या. हाच समृद्ध जीवनाचा कानमंत्र आहे !

— संकलन : अशोक साने
फेसबुक, WhatsApp यासारख्या माध्यमातून दररोज येणारे चांगले लेख तुमच्यासाठी  शेअर करतो.. लेखकाचे नाव माहित नाही.

Avatar
About Guest Author 523 Articles
मराठीसृष्टीवर ज्या लेखकांनी स्वत:चे अकाऊंट बनवले नाही त्यांचे लेख या Guest Author द्वारे प्रकाशित होतात. आपले सर्व लेख एकत्रितपणे मिळवण्यासाठी स्वत:चे अकाउंट मराठीसृष्टीवर जरुर बनवा.

Be the first to comment

Leave a Reply

Your email address will not be published.


*


महासिटीज…..ओळख महाराष्ट्राची

रायगडमधली कलिंगडं

महाराष्ट्रात आणि विशेषतः कोकणामध्ये भात पिकाच्या कापणीनंतर जेथे हमखास पाण्याची ...

मलंगगड

ठाणे जिल्ह्यात कल्याण पासून 16 किलोमीटर अंतरावर असणारा श्री मलंग ...

टिटवाळ्याचा महागणपती

मुंबईतील सिद्धिविनायक अप्पा महाराष्ट्रातील अष्टविनायकांप्रमाणेच ठाणे जिल्ह्यातील येथील महागणपती ची ...

येऊर

मुंबई-ठाण्यासारख्या मोठ्या शहरालगत बोरीवली सेम एवढे मोठे जंगल हे जगातील ...

Loading…

error: या साईटवरील लेख कॉपी-पेस्ट करता येत नाहीत..