दिवा होता छोटासा, एक मजकडे ।
इन्धन मिळतां तेलाचे, प्रकाश तो पडे ।।
तळांत होती योजना, तेल सांठवण्याची ।
शिरीं असूनी वात ती, क्रिया चाले जळण्याची ।।
छिद्र पडतां तळाला, व्यर्थ जाई इंधन ।
मंदावली ज्योत दिव्याची, शक्ती ती जावूनी ।।
देह आहे दिव्यासारखा, चैतन्य तेज तयाचे ।
प्रकाश फेकी आनंदाचा, इंधन मिळतां शक्तीचे ।।
केंद्रित होते देह उर्जा, नाभीच्या भोवतीं ।
व्यय टाळून प्रवाही करा, तीच प्रभूवरती ।।
ऐहिक सुखाच्या जातां मार्गीं, गुरफटतो संसारीं ।
तीच उर्जा प्राणास मिळतां, चेतवी ज्योत ईश्वरी ।।
डॉ. भगवान नागापूरकर
संपर्क – ९००४०७९८५०
bknagapurkar@gmail.com
Leave a Reply