ध्येय मिळण्या तुमचे योग्य लागते साधन
कष्ट होतील व्यर्थचे चूक मार्ग अनुसरुन ।।
अंतराळातील शोध महान बुद्धीचे प्रतीक
घेण्या अचूक वेध अवकाशयान असे एक ।।
अनंत दूरचे तारे न दिसती डोळ्यानी
दुर्बिणीच्या नजरें बघती सर्व कौतूकानी ।।
सूक्ष्म जंतूंचे अवलोकन, चक्षु घेण्या असमर्थ
त्याचे मिळण्या ज्ञान लागते सूक्ष्मदर्शक यंत्र ।।
यंत्र असे साधन जाणण्या कांहीं गोष्टी
इंद्रियाना मर्यादा असून न बघे सारी सृष्टी ।।
तसेंच आहे प्रभूचे जाणण्या त्याचे आस्तित्व
साधन पाहिजे तपाचे देऊनी परीक्षा सत्व ।।
दया क्षमा शांति ठरे श्रेष्ठ गुण
सत्य तप भक्ती, प्रभू मिळण्याचे साधन ।।
डॉ. भगवान नागापूरकर
९००४०७९८५०
e-mail- bknagapurkar@gmail.com
Leave a Reply