अप्रैल महिन्याच्या दुसर्या पंधरवड्यात दिल्लीत उन्हाची प्रखरता जाणवू लागते. दिवसाचे तापमान ४० अंशाच्या वर जाते. त्या सोबत दक्षिण पश्चिम दिशेहून येणारे उष्ण वारे हि दिल्लीत येऊन धडकतात. उष्ण वार्यांसोबत राजस्थानची रेत हि दिल्लीत पोहचते. पूर्वी हि धूळ लाल-पिवळी दिसायची. पण आता काळपट दिसते. दिल्लीत लाखो वाहने आणि फैक्ट्र्या रोज आकाशात धूर सोडतात. धुरावाटे नायट्रोजन, सल्फर, कार्बन यांसह घातक रासायनिक पदार्थ हवेत मिसळतात.प्रदूषित पदार्थांचे हि बारीक कण हि या धुरासोबत आकाशात पोहचतात. धुळीच्या आंधी सोबत हे सर्व प्रदूषण घरा-घरात पोहचते. डोळे लाल होणे, खोकला सुरु होणे, एलर्जी व अस्थमाचा त्रास वाढणे हे सर्व सामान्य झाले आहे. आठवड्यात किमान एकदा तरी प्रदूषित धुळीची आंधी येतेच. इतर ठिकाणी प्रचंड उन्हामुळे लू लागते पण दिल्लीत लू सोबत प्रदूषित धुळीचा त्रास हि सहन करावा लागतो.
मी निरुत्तर झालो, माझ्याच घरात काय, दिल्लीतल्या ८० टक्के घरांत आंगण नाही किंवा कुठले झाड हि नाही. रस्त्यांवरची झाडे हि दुकानदारांनी, आपले दुकान वाढविण्यासाठी केंव्हाच तोडून टाकली. मोठ्या-मोठ्या कोठीवाल्यांना हि त्यांच्या महागड्या कारांवर पडणारा झाडांच्या पानांचा कचरा सहन झाला नाही. त्यांनी हि झाडांना तोडून टाकले. आता धुळीच्या आंधीला विसाव्यासाठी कुठलीच जागा उरली नाही. थेट लोकांच्या घरात शिरणे तिची हि मजबुरी.
थोड्या वेळात आंधी संपली. झाडू-पोंछा घेऊन घरभर पसरलेली धूळ स्वच्छ केली. डोळ्यांत जळजळ होऊ लागली होती, खोकलता-खोकलता हालत खराब झाली होती. शेवटी नाईलाज होऊन डॉक्टर कडून औषध आणावे लागले.
— विवेक पटाईत
प्रदूषण (२७) – एक मुलाकात धुळीच्या आंधी सोबत
तुम्ही प्रदूषणावर लिहायचें मनावर घेतलें आहे, याचा फार फार आनंद आहे.
– सुभाष नाईक