रोज सन्ध्याकाळी सूर्य रन्ग सान्ड्तो
आई रागावेल म्हणून का तो लपतो?
वारा कसा सारखा भिरभिरत असतो
ग्रुहापाठाचा त्रास त्याला का नसतो?
पक्शी दिवसभर उडत राहातात
आम्ही थोडे खेळ्लो तर आईबाबा बोलतात
चन्द्राची आई त्याला रोज कप्डे शिवते
आभाळ्भर टाकतो कपडे तर तेच चान्दणे होते
नदी कशी सारखी गुणगुणत राहते
मी म्हटल गाण तर म्हणतात पुरे आता ते
सूर्य, चन्द्र्,नदी पक्शी यान्ची नाही कोणा सर
देवबाप्पा मला मी सोडून काहीही कर
— प्रभा मुळे
Leave a Reply