प्रांगणी येता प्रभातकिरणे
चैतन्याच्या कळ्या उमलती.
वेलीवरी झुळझुळता पर्णे
प्रसन्नतेची अंतरी अनुभूती.
मध्यान्हीला, श्रमलेलेही
साऊली, प्राजक्ती शोधती
कालचक्र ते फिरविणारा
भानू येता क्षितिजावरती.
सारे, नजारे गुलमुसलेले
सांजेला मंदिरी दीप तेवती.
वात्सल्याचे ते स्पर्श लाघवी
गुरे गोधुली प्रीत उधळत येती
रचना क्र. ६७
८/७/२०२३
– वि.ग.सातपुते. (भावकवी)
9766544908
Leave a Reply