एकाचा प्रश्न एकाने ऊत्तर देणे ही पद्धत असते. शाळेत. घरात किंवा इतर कुठल्याही ठिकाणी पण मन हे एक असे ठिकाण आहे की जिथे दोन्ही गोष्टी एकत्रच चालतात. निष्कर्ष काहीच नाही. उलट मानसिक त्रास होतो. आणि दुसर्यांना वाटते की स्वभावच असा आहे. काही अर्थ आहे का अशा गोष्टींना. एक पदवी मिळते चिंतातूर प्राणी. खूपदा प्रयत्न करुनही मन स्वस्थ बसत नाही. आणि हे म्हातारपणी फार तिव्रतेने होते. म्हणून दुहेरी त्रास होतो. एक म्हणजे आपल्याला आपला आणि दुसरा म्हणजे हे कुणीही समजून न घेता दोष देतात. उदा. घरातील कुणी येणार असतील तर रोजच्या वेळी न आले की मनात प्रश्न ऊत्तराचा तास सुरू होतो. इतका वेळ का लागला? रस्त्यावर गर्दी झाली असेल. अडकले असतील. गाडी पंक्चर झाली असेल तर वेळ लागतो यायला. ऑफिस मध्ये काम जास्त असेल. मग फोन करून सांगितले असते की. अपघात झाला असेल का. एक ना अनेक प्रश्न मनात येतात. मन अस्वस्थ असते म्हणून येरझारे घालणे. दाराकडे. फोन कडे लक्ष लागते आणि बोलायची सवय असते म्हणून दुर्लक्ष करणे किंवा धीर देणे हे सगळे सोडून उलट तुमच्या अशा येरझारे चालण्याने बदल होणार आहे का. तुम्ही काही करणार नाहीत तर विचार कशाला करायचा. हे सगळे कळत नाही का पण काळजी पोटी घडते. बर ती व्यक्ती आल्या वर विचारायचे नाही. कारण ते थकून आलेले आहेत….
मन इतके चंचल आणि कोडगे असते की एकदा आलेला अनुभव किंवा अपमान विसरून जातो. परत तेच घडते तरी शहाणपण येत नाही. ते समर्थ आहेत प्रत्येक गोष्टीत कसे निभावून न्यायचे. पण मायेला लाज नसते.
— सौ कुमुद ढवळेकर.
Leave a Reply