नवीन लेखन...

प्रतिबंध – भविष्याचा एकमेव मार्ग !

यंदाची अगदी मागील आठवड्यापर्यंत सुरु असलेली अतिवृष्टी सगळ्या राज्याला तापदायक ठरली. गावेच नाही तर शहरे तुंबली, रस्त्यांचे ओढे झाले आणि अपेक्षित राजकीय चिखलफेक झाली. प्रश्न असा आहे की त्यांतून आपण काही शिकणार आहोत कां ? अन्यथा पुढील वर्षी ” मागील प्रकरणावरून पुढे सुरु ”

कोठलीही समस्या उद्भवण्यापूर्वीच जर तिच्यावर काम केले तर खूप खर्च,ऊर्जा,मनःस्ताप आणि पैसे वाचू शकतात. याचं सगळ्यात महत्वाचं उदाहरण आहे- एव्हिएशन इंडस्ट्री ! वर्षभरात लाखो प्रवाश्यांना अशक्य उंचीवर घेऊन हिंडणारी हजारो विमाने त्यांच्यातील असंख्य फिरणाऱ्या घटकांसोबत क्वचितच आकाश सोडून भिरभिरतात आणि या यशामागे एकमेव कारण असते- प्रतिबंधात्मक देखभाल ! हीच त्यांच्यासाठी प्राधान्यक्रमाची गोष्ट असते. या अगदी उलट रस्त्यांवर आपण चालवीत असलेल्या वाहनांची अवस्था असते- किमान देखभालीवर आपण खुश असतो. गाडी पंक्चर झाली किंवा इंधन संपले की मगच आपण दुरुस्तीची कार्यवाही करतो.

या शतकाच्या /सहस्रकाच्या सुरुवातीला वाताहत करणारे/उध्वस्त करणारे भूकंपाचे झटके गुजरातमधील भूज च्या वाट्याला आले. अक्षरशः महिन्याभराने मी तिथे गेलो होतो आणि त्या सगळ्या नुकसानीचा साक्षीदार झालो होतो. गंमत म्हणजे त्याच आशापुरा ग्रुपने मला तीन वर्षांनी तेथेच पुन्हा प्रशिक्षणासाठी बोलाविले आणि त्यांच्या नव्याने बांधल्या गेलेल्या गेस्ट हाऊस मध्ये माझी राहण्याची सोय केली होती.संपूर्ण शहरावर जुन्या विध्वसांच्या कोठेही खुणा नव्हत्या. आशापुरा ग्रुपने त्यांची हाउसिंग कॉलोनी आणि गेस्ट हाऊस जपानी तंत्रज्ञान वापरून भूकंप रोधक उभारले होते. जपानला भूकंपाचे वरदान आहे त्यामुळे तिकडील तंत्रज्ञान इथे पूर्णतया उपयुक्त ठरले.

मला ” बॅबकॉक रँच ” यांनी उभारलेली ” उद्याचे घर” ही संकल्पना आठवली. सगळ्या नैसर्गिक आणि मानवनिर्मित आपत्तींना (डिझास्टर) समर्थपणे तोंड देऊ शकणारी- भविष्यातील विध्वसांवर मात करू शकणारी ! लहरी हवामानावर, अतिवृष्टीवर ताबा मिळवू शकणारी वसाहत ! अगदी जागतिक तापमान वाढीवर उत्तर ठरू शकणारी. गंमत म्हणजे हे सगळं बांधकाम आपल्या लहानपणातील खेड्यांना,छोट्या छोट्या गावांना समांतर जाऊ शकणारे !

ही आता हळूहळू “शाश्वत विकासाची ” ( Sustainability Growth) पायाभरणी ठरली आहे. उद्याचे चित्र आज अस्तित्वात आणणारी ही दूरदृष्टी म्हणजेच नेतृत्व, आजची मानव संसाधन विकास (HRD) संकल्पना ! फक्त कर्मचारीच नव्हें तर त्यांच्या कुटुंबीयांची सुद्धा परिपूर्ण देखभाल (प्रतिबंधात्मक) घेणारी नवी एच आर संस्कृती ! सगळे भावी बदल स्वीकारीत शाश्वतावरील नजर हटू न देणारी ! म्हणून आम्ही एच आर ला Fire Prevention म्हणतो, Fire Fighting नाही.

भविष्यात होऊ शकणाऱ्या बदलत्या जीवनाची सत्ये स्वीकारून आपले लक्ष फक्त शाश्वत विकासावर केंद्रीत करणारे एच आर !

आजच्या छोट्या मोठ्या विजयांवरून नजर हटवून, भविष्यामध्ये गुंतवणूक केली तर यंदाचे शहरीकरणाचे सगळे तोटे सहज ओलांडून जाता येईल. फक्त नेतृत्व तसे हवे- उद्याच्या आव्हानांना आजच्या संधींमध्ये रुपांतरीत करू शकणारे !

— डॉ. नितीन हनुमंत देशपांडे

डॉ. नितीन हनुमंत देशपांडे
About डॉ. नितीन हनुमंत देशपांडे 378 Articles
शिक्षणाने अभियंता, व्यवसायाने व्यवस्थापन सल्लागार, आवडीने लेखक ! माझी आजवर अकरा पुस्तके ( ८ मराठीत, २ इंग्रजीत आणि १ हिंदीत) प्रकाशित झालेली आहेत. आणखी चार पुस्तकांवर काम सुरु आहे. सध्या दोन मराठी वृत्तपत्रात साप्ताहिक सदर लेखन सुरु आहे. कथाकथन,काव्यवाचन, वक्तृत्व आणि वादविवाद स्पर्धांमध्ये राज्यपातळीवर सहभाग आणि पारितोषिके !

Be the first to comment

Leave a Reply

Your email address will not be published.


*


महासिटीज…..ओळख महाराष्ट्राची

रायगडमधली कलिंगडं

महाराष्ट्रात आणि विशेषतः कोकणामध्ये भात पिकाच्या कापणीनंतर जेथे हमखास पाण्याची ...

मलंगगड

ठाणे जिल्ह्यात कल्याण पासून 16 किलोमीटर अंतरावर असणारा श्री मलंग ...

टिटवाळ्याचा महागणपती

मुंबईतील सिद्धिविनायक अप्पा महाराष्ट्रातील अष्टविनायकांप्रमाणेच ठाणे जिल्ह्यातील येथील महागणपती ची ...

येऊर

मुंबई-ठाण्यासारख्या मोठ्या शहरालगत बोरीवली सेम एवढे मोठे जंगल हे जगातील ...

Loading…

error: या साईटवरील लेख कॉपी-पेस्ट करता येत नाहीत..