या प्रतिभेचे उपवन मनोहर
आत्मानुभूतीचा साक्षात्कार
संवेदनांचे लाघवी कुंजनवन
लोचनी तरळत रहावे निरंतर
प्रतिभा! वरदान सरस्वतीचे
भावनांचे, अमृतकुंभ विवेकी
दैवेप्रारब्ध्ये, प्राशिता अविरत
भावाविष्कार! उमलतो निरंतर
लडिवाळ भावनांची शब्दफुले
कुरवाळीती या तनमनांतराला
साक्षात प्रतिभेचे रूप सोज्वळ
मम हृदयी, रुणझुणते निरंतर
अलवार टपटपती शब्दकोमली
मी, वेचितवेचित माळीत जातो
अनामिकाची, ती कृपा आगळी
मी, लिहीत रहातो असा निरंतर
— वि.ग.सातपुते.(भावकवी)
9766544908
रचना क्र. २८.
२८ – १ – २०२२.
Leave a Reply