नवीन लेखन...

प्रतिभावंत लेखक श्री. ना. पेंडसे

श्री.ना. पेंडसे यांचे निधन झाले हे कळताच मला तो दिवस आठवला ज्या दिवशी एका नठाच्या गैरहजेरीत एक बदली कलाकार म्हणून आयत्यावेळी सर्वप्रथम तोंडाला रंग फासून एका व्यवसायिक नाटकाच्या निमित्ताने रंगभूमीवर पाय ठेवला ते नाटक होत श्री. ना. पेंडसे लिखित “संभूसांच्या चाळीत? स्थळ होते दादर येथील शिवाजी मंदिर. त्या नाटकाच्या निर्माता आणि त्या नाटकातील कलाकार सारेजण मित्र असल्याकारणाने केवळ अडचणीच्या काळात मदत म्हणून मी त्या नाटकात काम केले नाही तर ज्या नाटकाचे लेखक एवढे मोठे होते की त्यांच्या नाटकात छोटीसी का होईना एक भूमिका करण्याची संधी मला मिळाली त्याचा आनंद अधिक होता. तेच ते महान लेखक म्हणजेश्री. ना. पेंडसे. ज्याप्रमाणे कोकणातला आंबा सर्वत्र पसंत आहे तसे हे पेंडसे कोकणातले असून सुध्दा सर्वदूर मराठी रसिक मनाचे ताईत बनले.

जस जसे दिवस जाऊ लागले श्री. ना. पेंडसेंची अनेक पुस्तके व नाटके वाचू लागलो आणि त्यांच्या व्यक्तिमत्वाची ओळख होऊ लागली. पण पण,श्री. ना. पेंडसे म्हटलं की चटकन्‌ त्यांच्या प्रमुख कादंबऱ्या आठवतात त्या म्हणजे “गारंबीचा बापूर, *रथचक्र”, “लव्हाळी, “तुंबाडचे खोत.

पेंडसे मुळचे कोकणातले असल्या कारणाने त्यांचे कोकणावर नितांत प्रेम, त्यांनी कोकणच्या पार्श्वभूमीवर लिहीलेल “गारंबीचा बापू7 हे नाटक आणि त्या नाटकातील काशीनाथ घाणेकर यांनी साकारलेली बापूची भूमिका अत्यंत गाजली. केवळ बापूच गाजला नाही तर त्या नाटकातील राधा सुद्धा तेवढीच गाजली, म्हणूनच की काय त्यांनी सुमारे चार वर्षांनी “गारंबीची राधा” नावाची कादंबरी लिहीली. रसिकांनी बापूवर जेवढ प्रेम केल तेवढे प्रेम त्या गारंबीच्या राधेवर केल.

श्री. ना. पेंडसे यांचा जन्म ४ जाने. १९१३ साली रत्नागिरी जिल्हयातील मुर्डी या गावात झाला. ऐन तारुण्यात असताना त्यांचे वडील वारले, त्यामुळे फार कमी वयात असतानाच त्यांच्यापेक्षा लहान असलेल्या सहा भावंडांची जबाबदारी साहजिकच त्यांच्यावर आली. पण त्याही परिस्थितीत सुख-दु:खाच्या प्रसंगांना तोंड देत जिद्दीने मार्ग काढत ते आयुष्य जगले. हे सार आयुष्य जगताना त्यांनी आपल्या स्वाभिमानाशी कधी तडजोड केली नाही. त्यांच्या स्वभावाला काहीजण विक्षिप्त म्हणून संबोधित असत. घरातली जबाबदारी खांद्यावर असताना पेंडसे मुंबईत बेस्टमध्ये नोकरी करत असतानाच “बेस्टची कथा? या नावाच एक पुस्तक लिहलं. हेच पुस्तक पुढे “बेस्ट स्टोरी? या नावान इंग्रजीत प्रसिध्द झाल. दुर्दैव अस की या पुस्तकाबद्दल कुणाला खास माहिती नव्हती. कदाचित त्याचं हे एकमेव अस पुस्तक असेल. त्यांच्या बेस्टच्या नोकरीबद्दल सुध्दा फारस कुणाला माहित नव्हतं. त्यांना स्वत:च्या जातीबद्दल अत्यंत आदर आणि दुसऱ्यांच्या जाती दुय्यम मानीत. ते म्हणत की, महाराष्ट्रात केवळ दोन जाती त्यापैकी एक कोकणस्थ चित्पावन आणि इतर सर्व एक. त्यांच्या स्वभावतला बंडखोरपणा त्यांच्या पुढील घटनेवरुन दिसून येईल. ०९७४ साली श्री. ना. पेंडसे यांनी “लेखक आणि माणूस? या नावाच त्यांच चरित्र प्रसिद्ध झाल. तेव्हा त्या पुस्तकावर लेखक म्हणून “एक मित्र’ असं लिहीत होत तेव्हा अनेकांच्या श्ुवया उंचावल्या गेल्या आणि हे एक मित्र कोण म्हणून चर्चा सुरु झाली. पुढे तो मित्र म्हणजे ते स्वतःच आहेत हे उघड झाल. स्वत:च स्वत:ची या ग्रंथाबद्दल चिकित्सा करताना श्री. ना. पेंडसे म्हणतात “एल्गार”, “हद्दपार आणि ‘गारंबीचा बापू या कांदबऱयातील नायक एकच आहे. तो फक्त वेगवेगळया भूमिकेतून वाचकांपुढे येतो कारण हे तिन्ही *नायक अन्यायाविरुद्ध आवाज उठविणे हे काम करतात.

१९६४ साली त्यांच्या ‘र्थचक्र* या कांदबरीला साहित्य अकादमीचा पुरस्कार मिळाला होता. त्यांच्या “एल्गार? या पहिल्या कादंबरीला सर्वोत्कृष्ट कादंबरीसाठीचा पुरस्कार मिळाला होता. तसेच कुसुमाग्रज प्रतिष्ठानचा “जनस्थान” पुरस्कार त्यांच्या मराठी साहित्यात विशेष मोलाची कामगिरी केल्याबद्दल मिळाला होता. एक लाख रुपये सन्मानचिन्ह व गौरवपत्र असे या पुरस्काराचे स्वरुप होते. ज्ञानपीठ पुरस्कार विजेते विख्यात साहित्यीक श्री. अशोक वाजपेयी यांच्या हस्ते देण्यात आला होता. नाशिकच्या महाकवी कालिदास कला मंदिरात अत्यंत साधेपणाने हा सोहळा झाला होता. सत्काराचाउत्तर देताना श्री. ना. पेंडसे म्हणाले होते की, “जनस्थान” मुल्ये जगणारी माणसे अपवादानेच भेटतात.

कुसुमाग्रज हे अशा माणसांपैकी एक म्हणून मला त्यांच्याबद्दल नितांत आदर आहे. . अशा व्यक्‍तीने स्थापन केलेल्या प्रतिष्ठानचा पुरस्कार मिळाला ही माझ्या दृष्टीने अत्यानंदाची गोष्ट आहे. एकच आणि ती म्हणजे माणसाच वय. दुःख नेहमी तुलनेत असत. तुलना आली की, हेवा मत्सर आलाच म्हणून मुळात तुलनाच करायची नाही. आपली इच्छा, आकांक्षा खूप मोठी हवी पण त्याबरोबर आपल्या मर्यादा, कुवत हेही आपल्याला माहित पाहिजे. एखादी व्यक्‍ती आपल्याशी वाईठ वागली तर निराश न होता ती व्यक्‍ती तशीच वागणार होती हे स्वीकारुन पुढची वाटचाल अधिक जिद्दीने चालू ठेवावी. अशी फिलॉसॉफी शिकविणारे श्री. ना. पेंडसे निरोगी जीवन जगण्याचा जणु काही कानमंत्रच देतात.

नवोदित लेखकांच्या बाबतीत श्री. ना. पेंडसे यांचे मार्गदर्शन हे एखाद्या दिपस्तंभाप्रमाणे आहे. ते नेहमी म्हणायचे की, लेखकाने लिखाण करताना ते लिखाण म्हणजे एक भव्य शिल्प, समग्र कस दिसेल ते बघाव. ते बघताना शिल्पाला स्पर्श न करता अंतर ठेवून बघाव आणि मग त्याच दर्शन रसिकांना घडवाव. पुराव्याशिवाय कोणतेही विधान करु नये. वा! वा! सुंदर! असल्या उद्‌गारांना सक्‍त बंदी असावी. लेखनात हळवेपणा नसावा, शब्द हे नाजुक संवेदनशील असले तरी शब्दांना वजन असतं याची जाणीव ठेवली पाहिजे. विशेषण वापरताना काळजी घ्यावी ते आवश्यक असेल तरच वापरावं. आशय शब्दांच्या मागे लागता कामा नये. शब्दांनी आशयाचा शोध घ्यायला हवा. त्यांच्या ज्या नाटकाचे हजारो प्रयोग झाले. त्याने अनेक विक्रम मोडले असे “संभूसांच्या चाळीत? या नाटकाबद्दल ते असं म्हणाले होते की, या नाटकाचे हजारो प्रयोग झाले तरीही मी खऱ्या अर्थाने नाटककार नाही. नाटक लिहील ते केवळ त्यावेळी पैसे मिळवण्यासाठी, मी कुणाकडेही घेवून गेलो नाही, कुणी आपल्याकडे आले तरच द्यायच अस ठरवल होत.

श्री. ना. पेंडसे यांना ज्येष्ठ कवी विंदा करंदीकर हे आदरस्थानी होते. त्यांच्या कविता ते नेहमी आवडीने वाचत _ असतं. जेव्हा गारंबीचा बापू? कांदबरी प्रसिध्द झाली. तेव्हा _ अनेक नामवंत पेंडसेच्या घरी गेले. त्यात एके दिवशी विंदा करंदीकरही गेले. त्यांनी स्वत:शी ओळख करुन दिली मी गो. वि. करंदीकर मला विंदा करंदीकर असं म्हणतात हे ऐकून पेंडसे भारावून गेले. मग दोघात झालेल्या गप्पा रंगल्या कदाचित दोघेही कोकणातील असावेत म्हणून.

श्री. ना. पेंडसे कोणत्याच साहित्यिकाशी वाद घालत नसतं. ते नेहमी त्यांच्या चिंतनात मग्न असायचे. त्यांना त्यांच्या एका मित्राने विचारल की तुम्ही साहित्यसंमेलनाच्या अध्यक्षपदासाठी काउके राहत नाहीत? स्पष्ट वक्‍ते असणारे पेंडसे यांनी त्यांना ताबडतोब सुनावले की, मान मागायचा असतो की द्यायचा असतो? प्रसिध्दीच्या मागे जायच नाही. प्रसिध्दी आणि पैसा ही आपल्या मागून आली पाहिजेत जे काय मिळायचे असेल ते मिळेल, नाहीतर नाही मिळणार. हीच वृत्ती त्यांच्या जगण्यात होती. दुश्वास, असुया यांचा स्पर्शही पेंडसेंना नव्हता. ते नेहमी सांगत “प्रसिध्दी आणि पैसा यासारखा शाप नाही.? एकदा त्याची सवय लागली की गरज कुठे संपली आणि हव्यास कुठे सुरु झाला तेच कळत नाही.

कोकणावर अतिशय प्रेम करणाऱ्या या कोकणच्या सुपुत्राला आम्हा सर्व ठाणेकरांतर्फे आदरांजली

विद्याधर ठाणेकर 

जनादेश ४ एप्रिल २००७

Avatar
About विद्याधर ठाणेकर 16 Articles
विद्याधर ठाणेकर हे ठाणे मराठी ग्रंथ संग्रहालयाचे अध्यक्ष आहेत. ते मराठी नाट्य परिषदेच्या ठाणे शाखेचे कार्यवाह आहेत. ते ठाण्यातील अनेक सामाजिक संस्थांशी निगडित आहेत.

Be the first to comment

Leave a Reply

Your email address will not be published.


*


महासिटीज…..ओळख महाराष्ट्राची

गडचिरोली जिल्ह्यातील आदिवासींचे ‘ढोल’ नृत्य

गडचिरोली जिल्ह्यातील आदिवासींचे

राज्यातील गडचिरोली जिल्ह्यात आदिवासी लोकांचे 'ढोल' हे आवडीचे नृत्य आहे ...

अहमदनगर जिल्ह्यातील कर्जत

अहमदनगर जिल्ह्यातील कर्जत

अहमदनगर शहरापासून ते ७५ किलोमीटरवर वसलेले असून रेहकुरी हे काळविटांसाठी ...

विदर्भ जिल्हयातील मुख्यालय अकोला

विदर्भ जिल्हयातील मुख्यालय अकोला

अकोला या शहरात मोठी धान्य बाजारपेठ असून, अनेक ऑईल मिल ...

अहमदपूर – लातूर जिल्ह्यातील महत्त्वाचे शहर

अहमदपूर - लातूर जिल्ह्यातील महत्त्वाचे शहर

अहमदपूर हे लातूर जिल्ह्यातील एक महत्त्वाचे शहर आहे. येथून जवळच ...

Loading…

error: या साईटवरील लेख कॉपी-पेस्ट करता येत नाहीत..