क्रियेला प्रतिक्रिया, ध्वनीला प्रतिध्वनी
तत्व ते सनातन, दिसे नित्य जीवनी
फेकतां जोराने, आदळे भिंतीवरी
प्रवास परतीचा, होई तुमचे उरीं
शिवी वा अपशब्द, दिले कुणासाठी
येवूनी धडकतील, तुमचेच पाठीं
प्रेमाने बोलणे, सुंगध आणिते
आनंदी लहरी, मनां सुखावते
डॉ. भगवान नागापूरकर
९००४०७९८५०
Leave a Reply