पसरूनिया दोन्ही बाहू
मी उभा तव प्रतीक्षेत
भास तुझाच अवकाशी
प्रीती पाझरते अंतरात ।।१।।
तव स्मृतींतुनी रमता
मी न माझाच उरतो
श्वासात गंधते कस्तुरी
ओठावरी उमलते गीत ।।२।।
माहोल, सारा सुगंधी
परिमल हा चंदनगंधी
सुखवितो या जीवाला
लोचनी ओघळते प्रीत ।।३।।
आवेग हा भावनांचा
व्याकुळ शब्द, शब्द
रचितो अलवार काव्य
तुझ्याच हृद्य स्मरणात ।।४।।
मीच हा वेंधळा बावरा
अविरत, तव प्रतीक्षेत
पसरूनिया बाहू दोन्ही
आळवितो हे भावगीत ।।५।।
©️ वि.ग.सातपुते.(भावकवी)
9766544908
रचना क्र. ७८
१७-६-२०२१.
Leave a Reply