प्रत्येकाचा पाऊस वेगळा असतो!!
मनाला आनंदाने स्पर्शून जाणारा असतो!
पाऊस कसा असतो ?
घन भरुन आभाळी दाटून येतो.
मेघातून किरणे सोडत सरीतून बरसतो!!
प्रियकर प्रेयसीच्या डोळ्यांत चिंब भिजून असतो!!
पाऊस सगळ्यांचा असतो.
लहान,थोर स्त्री, पुरुष प्रत्येकाचा पाऊस
वेगळा असतो.
पाऊस वेल्हाळ असतो.
नवं तारुण्यातील युवतीला बेफाम बनवतो! स्त्रीला अवखळ बनवतो.
निरागस बलिकेला अल्लल्ड बनवतो!!
पाऊस तन मनात, रोमारोमात असतो.
रानोवानी चिंब भिजणाऱ्या सळसळत्या तारुण्य उपभोगणाऱ्या मुलांमध्ये असतो !!
असा हा पाऊस चैतन्य उत्साह भरुन तन गंधित करणारा कितीही भिजा मनाला भुरळ पाडणारा!!
घन आले नभ भरुन
वाट ही पावसाळी चिंब,
येईल सरी धरतीवर अलगद
ओला नजारा मन खुलते हलकेच..
चिंब भिजावे भरल्या आभाळी
मनसोक्त पाऊस झेलावा अंतरी,
विसरावे सारे बंध या पावसाळी
वाट अलगद चुकेल घन माथ्यावरी..
भिजवतो पाऊस मला असा
बेधुंद रोमांचित फुलतो मना,
निसर्ग खुलतो भवताली असा
पावसात भिजतील श्यामल मेघ धारा..
— स्वाती ठोंबरे.
Leave a Reply