सकाळचा उत्तराखंडातल्या नैनीताल जिल्ह्यातील रामनगर ते जुनी दिल्ली असा प्रवास, ‘रामनगर -दिल्ली संपर्क क्रांती लिंक एक्सप्रेस’ अशा त्या रेल्वेसारख्याच लांबलचक नांवाच्या रेल्वे गाडीनं केला. उत्तर प्रदेश-बिहारकडच्या रेल्वेप्रवासातील गर्दीच्या काही फिल्म्स डिस्कव्हरी-नॅशनल जिओग्राफीक चॅनलवर पाहील्या होत्या, त्या प्रत्यक्ष अनुभवल्या. ‘फेव्हीकाॅल’ची ती गाडीला माणसं चिकटलेली प्रसिद्ध निशब्द आणि पकिणामकारक अॅड तिच्या निर्म्यात्याला बहुतेक इथेच सुचली असावी असं मला वाटतं. आमचं रिझर्वेशन असुनही अंग चोरून बसावं लागलं होतं, एवढी गर्दी. खुप वर्षांनी ‘माणसां’तून प्रवास केल्यासारखं वाटलं. आपल्यासारखे पांढरपेशे लोक समाजातल्या ज्या थरातील लोकांकडे पाहून नाक मुरडतो, तसल्या तथाकथीत ‘लो क्लास’ समाजाची गर्दी होती ती. पण ही माणसं खऱ्या अर्थानं ‘माणसं’ असतात. सेकंड अथवा थर्ड क्लासवाल्यांची माणूसकी ही अस्सल असते कारण त्यांचं जगणं एकदम असली असतं. त्यांचं प्रेमही अस्सल, दोस्तीही अस्सल आणि दुश्मनीही अस्सलच, बाकी आपण पांढरपेशे त्यांच्या तुलनेत खुपच नकली जगत असतो, याचा मला पुन्हा पुन्हा अनुभव येत असतो. इथंही आलाच..
संपूर्ण वाचण्यासाठी पुढील लिंकवर क्लिक करा..
https://www.facebook.com/nitin.salunke.1297/posts/1351494784905375
Leave a Reply