ती गाडीतून खाली उतरली पाठोपाठ दोन मुले आणि एक म्हातारी बाई पण उतरली,ती तिची सासू असणार असा मी अंदाज केला होता , ती सासूच होती.
ते सर्वजण जवळ आले तेव्हा ती सून हसली माझ्याकडे बघून, मी पण हसले.
पण तिच्या सासूला जेव्हा बघितले तेव्हा लक्षात आले ह्या बाईना कुठेतरी आधी, पूर्वी पाहिले आहे, ती सासूपण हसली ,
ती पण माझ्याकडे बघत होती.
मी सांगितले आता आलात चहा घ्यायला थोड्यावेळाने या.
तशी ती सून म्हणाली निश्चित येतो आणि हसली कारण ती आणि तिचा नवरा ब्लॉक घेतला तेव्हा आधी येऊन गेले होते.
मी परत गप्पा मारू लागले ,माझ्या मंत्रिणींशी पण डोक्यात एकच विचार येत होता या बाईला कुठेतरी पाहिले आहे.
दुपारी मी त्यांच्या घराची बेल दाबली, चहाला बोलावण्यासाठी कारण मी गिरगावच्या चाळीत मोठी झालेली असल्यामुळे हा स्वभाव ब्लॉक मध्ये राहिल्या मुळे अजिबात बदललेला नव्हता मला माणसे आवडत असत.
दुपारी मी कांदे पोहे केले होते आणि चहा .
ते पाच जण आले, गप्पा सुरु झाल्या. तुम्ही आधी कुठे रहात होता, म्हणजे लग्नाआधी
त्या आजीने विचारले करण तिच्या डोक्यात देखील कुठेतरी पाहिले आहे हे घोळत असणार हे तिच्या आवाजावरून मी ओळखले होते.
मी म्हणाले गिरगावात , काळा राम मंदिराजवळच्या चाळीत . ती पटकन म्हणाली त्या भोळे बाई कोण त्या तुमच्या गोऱ्या , लांब नाक असलेल्या हे शब्द ती माझ्या नाकाकडे बघत होती हे माझ्या लक्षात आले. ती माझी आई मी म्हणाले त्या आजींचा चेहरा उजळला , म्हणाल्या त्या खूप गोऱ्या होत्या .
आता माझी उत्सुकता वाढली म्हणाले तुम्ही कशा ओळखता.
त्यानंतर ती हसली, तिच्या सुनेला , मुलाला कळले ती का हसली ते पण मला नाही कळले माझी उत्सुकता वाढली होती.
आजी म्हणाली तू 15-16 वर्षाची होतीस. मी तुमच्या चाळीत येत असे . तुमच्या छोट्या गॅलरी मध्ये शिवणाचे मशीन होते पण ते तसेच पडलेले होते. खरे ना , तिने मला विचारले तेव्हा मी हो म्हणाली.
आजी म्हणाल्या मी नेहमी पहात असे. तुझे वडील पण होते तेव्हा . मी शेजाऱ्यांच्या ओळखीने तुझ्या आई बाबांना विचारले मला मशीन द्याल का तुम्ही वापरत नसाल तर.. खरे तर तुझ्या आईचे ऑपेशन झाल्यामुळे ती मशीन चालवू शकत नव्हती.
दोन दिवसानी तुझे बाबा म्हणाले आम्ही बोरिवलीच्या शिफ्ट होत आहोत. तिथे याची अडगळच होईल, वापरत नाही आम्ही.
मी घाबरत म्हणाले पैसे किती तर त्यांनी शेजाऱ्याकडे पाहिले णे ते समजून गेले.
ते म्हणले फुकट घे , उपयोग कर, विकू नकोस. त्यानंतर मी त्या मशीनवर कपडे शिवू लागले.
मी फक्त ऑलटर ची कामे करू लागके, मला नवरा नव्हता ,हा मुलगा होता त्याला शिकवले पुढे खूप शिकला.
हळूहळू कामे बंद केली, मुलानेच सांगीतले होते. तिने आईबाबाबद्दल विचारले तेंव्हा म्हणले आता दोघेही नाहीत.
तिने हात धरून मला तिच्या ब्लॉकमध्ये नेले
गॅलरीमध्ये तेच शिवण्याचे मशीन होते.
एक वर्तुळ पुरे झाले होते .
— सतीश चाफेकर
Leave a Reply