नवीन लेखन...

कापड खरेदी करताना काय काळजी घ्यावी?

एकूण घरगुती कापड वापराचे ढोबळमानाने दोन वर्गात विभाजन करता येईल. एक म्हणजे अंगावर घालायचे कपडे आणि दुसरे म्हणजे पडदे, अंथरायच्या- पांघरायच्या चादरी, फरशी पुसायचे डस्टर, पायपुसणे इत्यादी. यामध्ये अंगावर घालायचे कपडे अधिक महत्वाचे म्हणून लक्षात घ्यायला हवे.

कापड निर्मिती करताना त्याचा वापर कशाकरिता करावयाचा आहे, त्याचे महत्व प्रथम लक्षात घेतले जाते. त्याकरिता वापरले जाणारे तंतू, त्याचे सूतांक, ताणा-बाण्याची घनता अशा सर्व तांत्रिक बाबी ध्यानात ठेवल्या जातात.

शर्ट करिता वापरले जाणारे कापड, पॅन्टकरिता वापरले जाणारे कापड यात बरीच भिन्नता असते. तिथे या बाबी चटकन लक्षात येतात. शिवाय कापडात वापरलेला तंतू कोणता, मिश्रतंतूंचे प्रमाण किती याचा उल्लेख कापडावर केलेला असतो, नव्हे ते करणे बंधनकारक आहे, ते आपण पहायला हवे.

मिश्र तंतूंमध्ये पॉलिएस्टरचे प्रमाण ६५ ते ६७ टक्के असणे आपल्याला उपकारक आणि परवडणारे आहे. उर्वरित ३५ ते ३३ टक्के कापूस असणे आपल्या देशातील हवामानाच्या दृष्टीने सोयीस्कर आणि हितावह आहे. या प्रमाणात मिश्रतंतू पॉलिएस्टर असल्यास आणि कापूस या दोन्ही तंतूंचे चांगले गुणधर्म आपल्याला फायदेशीर ठरतात. त्यामध्ये पॉलिएस्टरचे प्रमाण वाढवल्यास घाम शोषून न घेण्याच्या त्याच्या गुणधर्मामुळे ते आपल्याला त्रासदायक ठरू शकते.

अशावेळी टेक्स्चरायझिगंची प्रक्रिया पॉलिएस्टरवर केली असेल तर आपली अडचण काही प्रमाणात तरी सुटते. या प्रक्रियेचा उल्लेखसुध्दा कापडावर केलेला असतो. सुटाकरिता घ्यावयाचे कापड असे पॉलिएस्टर अधिक कापूसमिश्रित किंवा पॉलिएस्टरअधिक लोकर मिश्रित असेल तर ६५/३५ टक्के हेच प्रमाण अधिक उपयुक्त ठरते.

कापडाच्या किमती कमी करण्यासाठी पुनर्निर्मित तंतूंचे मिश्रण कापडात केले असल्यास, त्याचा उल्लेख तपासायला हवा. ‘पॉलिनॉजिक’ हा तंतू किंमत कमी करण्यासाठी सर्रास वापरतात. तो तंतू कमकुवत आहे, त्यामुळे कापडाचा टिकाउपणा कमी होतो, तसेच घर्षण होत असलेल्या कापडाच्या जागेवर गोळी धरते.

एक ग्राहक म्हणून आपण जागरूक राहिलो, तर आपली फसगत सहजी टाळता येईल.

दिलीप हेर्लेकर
मराठी विज्ञान परिषद

Be the first to comment

Leave a Reply

Your email address will not be published.


*


महासिटीज…..ओळख महाराष्ट्राची

गडचिरोली जिल्ह्यातील आदिवासींचे ‘ढोल’ नृत्य

गडचिरोली जिल्ह्यातील आदिवासींचे

राज्यातील गडचिरोली जिल्ह्यात आदिवासी लोकांचे 'ढोल' हे आवडीचे नृत्य आहे ...

अहमदनगर जिल्ह्यातील कर्जत

अहमदनगर जिल्ह्यातील कर्जत

अहमदनगर शहरापासून ते ७५ किलोमीटरवर वसलेले असून रेहकुरी हे काळविटांसाठी ...

विदर्भ जिल्हयातील मुख्यालय अकोला

विदर्भ जिल्हयातील मुख्यालय अकोला

अकोला या शहरात मोठी धान्य बाजारपेठ असून, अनेक ऑईल मिल ...

अहमदपूर – लातूर जिल्ह्यातील महत्त्वाचे शहर

अहमदपूर - लातूर जिल्ह्यातील महत्त्वाचे शहर

अहमदपूर हे लातूर जिल्ह्यातील एक महत्त्वाचे शहर आहे. येथून जवळच ...

Loading…

error: या साईटवरील लेख कॉपी-पेस्ट करता येत नाहीत..