नॉस्ट्रडेमस !! आपल्या अद्भुत भविष्यवाणीने संपूर्ण जगाला चकित करणारा महान भविष्यवेत्ता!! ज्याच्या भविष्यवाणीची चर्चा आजही होते.
नॉस्ट्रडेमसचा जन्म डिसेंबर 1503 मध्ये फ्रान्समधील सेंट रेमी या खेडेगावी झाला. वडील धान्याचे व्यापारी होते. नॉस्ट्रडॅमस हा नऊ भावंडात सर्वात छोटा.वयाच्या 14 व्या वर्षी नॉस्ट्रॅडॅमस आपल्या बॅचलर डिग्रीचा अभ्यास करण्यासाठी अॅविग्नॉन विद्यापीठात दाखल झाला. एक वर्षापेक्षा जास्त काळ नॉस्ट्रॅडॅमसने भूमिती, अंकगणित, संगीत आणि खगोलशास्त्र ज्योतिष शास्त्र, व्याकरण, वक्तृत्व आणि तर्कशास्त्र याचा नियमित अभ्यास केला.परंतु त्याच्या दुर्दैवाने प्लेगच्या साथीमुळे त्याला विद्यापीठ सोडावे लागले.इसवीसन 1521 ते 15 29 यादरम्यान सुमारे आठ वर्ष नॉस्ट्रॅडॅमसने खेडोपाडी वनौषधींचे संशोधन आणि प्लेगच्या पीडित व्यक्तींवर उपचार करत संपूर्ण फ्रान्स आणि इटलीमध्ये प्रवास केला.
नॉस्ट्रडॅमस आपल्या वयाच्या 47 व्या वर्षात वैद्यकीय क्षेत्र सोडून ज्योतिष शास्त्र आणि जादू विद्या याचा अभ्यास करू लागला.1550 मध्ये तो वार्षिक पंचांग बनवू लागला,ज्यामध्ये हवामानाची स्थिती आणि ग्रहांची माहिती या विषयी पूर्व अनुमान केले असायचे. यातील बरीच अनुमाने ठरल्याचे सांगितले जाते.
नॉस्ट्रडॅमसचे लक्ष आता वैद्यकीय पेशाकडे लागत नव्हते.स्वतःला आपल्या अभ्यासिकेत कोंडून घेत अभ्यासामध्ये तासनतास घालवित असे.असे म्हटले जाते की तो रात्री पाण्यात औषधी वनस्पतींनी भरलेल्या वाडघ्यासमोर ध्यान करत असे.यादरम्यान भविष्यात घडणाऱ्या गोष्टीविषयी दृष्टांत होत असे असे त्याचे म्हणणे असायचे. भविष्यातील त्याच्या भविष्यवाणीचा आधार हाच दृष्टांत होता असा त्याचा विश्वास होता. नॉस्ट्राडामसने त्यांच्या दृश्यांबद्दल लिहिण्यास प्रारंभ केला आणि त्यास त्याच्या पहिल्या पंचांगात समाविष्ट केले. या प्रकाशनास चांगला प्रतिसाद मिळाला आणि त्याचे नाव संपूर्ण फ्रान्समध्ये पसरले, ज्याने नॉस्ट्रडेमसला अधिक लिहिण्यास प्रोत्साहित केले.
इसवीसन 1555 मध्ये त्याने लिहिलेल्या ‘द प्रोफेसी’ या पुस्तकाने त्याला संपूर्ण जगात प्रसिद्धी मिळवून दिली. या पुस्तकामध्ये त्याने जवळपास दोन हजार वर्षाचे भविष्य लिहून ठेवले आहे. अर्थात ही भविष्ये
कविता आणि सांकेतिक भाषेचे स्वरूपात लिहीलेली आहेत.
खरी ठरलेली भविष्ये
नॉस्ट्रडॅमसने सांगितलेली बरीच भविष्य खरी ठरली आहेत.. त्याच्यामध्ये फ्रेंच राज्यक्रांती, लेडी डायनाचा मृत्यू, ग्रेट फायर ऑफ लंडन, हिटलरचा उदय, अणुबॉम्बचा शोध, दुसरे महायुद्ध,अमेरिकेतील 9 11 चा हल्ला, यांसारख्या घटनाबाबत नॉस्ट्रडॅमसची भविष्यवाणी तंतोतंत खरी ठरल्याचे दिसून आले आहे.
भारताविषयीची भविष्यवाणी
आपल्या भारत देशाविषयी देखील नॉस्ट्रडेमसने भविष्यवाणी केलेली आहे. त्यातील पंतप्रधान इंदिरा गांधी
यांचा उदय, राजीव गांधींची हत्या, भारताची महासत्तेकडे वाटचाल, अजेय शासकाचा जन्म यांसारख्या भविष्यवाणीचा समावेश होतो. अर्थात ही सर्व भविष्यवाणी सांकेतिक भाषेत असल्यामुळे त्याचा अर्थ उलगडायला लागतो. उदाहरणादाखल भारताविषयीची भविष्यवाणी पहा.
‘एक असा देश ज्याचे नाव एका महासागराच्या नावाने असेल.ज्या देशाला तीन सागर एकत्र येऊन मिळतात त्या देशात एक अजेय शासक जन्म घेईल आणि तो संपूर्ण जगाचे नेतृत्व करेल.’
जगाच्या नकाशात भारत असा एकमेव देश आहे ज्याला तीन सागर एकत्र येऊन मिळतात आणि भारत देशाचे नाव हिंद महासागरावरून हिंदुस्थान असे पडले आहे, त्यामुळे नॉस्ट्रडॅमसची ही भविष्यवाणी भारताविषयी आहे याची खात्री पटते.
अजेय शासक नरेंद्र मोदी?
ज्या अजेय शासकाचा उल्लेख नॉस्ट्रडॅमसने आपल्या भविष्यवाणीत केला आहे, त्याची काही वैशिष्ट्ये सांगितली आहेत. तो नेता शांतिप्रिय आणि लोकप्रिय असेल,तो वयस्कर असला तरीही आपल्या बुद्धीने आपल्या देशाला विश्वशक्ती बनवेल.
अर्थात ही सर्व वर्णने तंतोतंत भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना लागू पडतात असे म्हटले जाते, भाजपा नेते किरीट सोमय्या यांनी देखील अशा प्रकारचे विधान केले होते. तूर्तास तरी अशी वर्णने लागू पडणारा दुसरा कोणताही नेता संपूर्ण भारतभरात नसल्याने त्यात तथ्य आहे असे म्हणावे लागेल.
2020 नंतरची भविष्यवाणी
2020 नंतर काय होईल याविषयी देखील नॉस्ट्रडॅमसने भविष्यवाणी केली आहे. 2020चे वर्षे विनाशाचे असेल. अनेक नैसर्गिक आपत्ती आणि महामारीला तोंड द्यावे लागेल. त्यामुळे मनुष्यहानी होईल, याच भविष्यवाणीचा संबंध कोरोना व्हायरसशी लावला जातोय.याशिवाय युद्धजन्य परिस्थिती निर्माण होईल असे देखील सांगितले होते. जानेवारीच्या सुरुवातीस इराण आणि अमेरिकेतील संघर्ष पाहता ही भविष्यवाणी खरी ठरल्याचे दिसून येते आहे. जागतिक बाजारावर कब्जा करण्याचा चीनचा प्रयत्न पाहता कोरोनाव्हायरसचा वापर चीनने आपले वर्चस्व वाढवण्यासाठी केला असे म्हणण्यास वाव आहे. त्यामुळे 2020 नंतर तिसरे महायुद्ध होईल अशी नॉस्ट्रडॅमसने केलेली भविष्यवाणी देखील खरी होण्याची शक्यता नाकारता येत नाही. अर्थात भारताविषयी दिलासादायक गोष्ट ही त्या महायुद्धाचा भारतावर फारसा परिणाम होणार नाही आणि भारत देश या युद्धानंतर संपूर्ण जगाचे नेतृत्व करेल. याशिवाय लोकांचा कल अध्यात्माकडे अधिक झुकेल असेही नॉस्ट्रडॅमसने म्हटले आहे.
अर्थात ही भविष्ये आहेत जी अनुमानावर आधारित आहेत ती कितपत खरी ठरतील हे येणारा काळच ठरवेल.
Amazon वेबसाइटवर या विषयी एक पुस्तक आहे ते तुम्ही मोबाइलमधे डाउनलोड करून वाचू शकता.
पुस्तक पाहण्यासाठी येथे क्लिक करा
https://amzn.to/2JpcgqM
Great Vijay, keep it up, go ahead, all the best ??
Awesome thoughts, good explanation