अशा झुंजूमुंजू समयी
सखया याद तुझी यावी
केशरी लाली नभाची
गाली माझ्या चढावी
कलकलाट कोकिळेचा
तीव्र असा होत जाई
आठवे ती हुरहूर सारी
मन कातर कातर होई
ओढ अशी कशी ही बाई
जग सारे विसरून जाई
कधी पुन्हा भेट अपुली
जी होता होत नाही
ये एकदा तू परतुनी
मनी चिंब ओलावा लेउनी
शुष्क कोरडी ही माती
दे शिंपून प्रीत अंगणी!!
— वर्षा कदम.
Leave a Reply