विसरू कसे , क्षण मी सारे
दाटती पापण्यातही अजुनी
लपंडाव ते चकोर चांदण्यांचे
गगनी प्रीत भारलेली अजुनी ।।१।।
आत्मरंगले प्रीतभान दंगलेले
मीच माझेच मीत्व विसरलेले
तनमन , हृदयी तूच तूच एक
दरवळ तूझा अंतरात अजुनी ।।२।।
कळते सारे सावरतो स्वतःला
आंस ! अंतरास तव दर्शनाची
मन बेचैन भिरभिरते सभोवार
बंद नेत्री तरळतेस तुच अजुनी ।।३।।
– ©️ वि.ग.सातपुते.(भावकवी)
9766544908
रचना क्र. ८८.
१ – ६ – २०२१.
Leave a Reply