प्रीतफुलां, रे प्रीतफुलां, सुगंध तुझा घमघमला,
भरभरून ओंजळीतला,
दरवळ हृदयाने सामावला,–!!!
तन-मन सुगंधित होता,
कायापालट पाहता पाहता,
क्षण -क्षण आनंदात विचरला,— पाकळी पाकळी तुझी फुलतां,–!!!
उत्साही लहरी उफाळता,
अणू रेणू सारे रोमांचता,
लाजून गेली रुपगर्विता,
तरल भावना-कल्लोळ उठला,-!
आठवण त्यांची येता,
मन मोर थुईथुई नाचला,
अशा भावविभोर चित्ता,
जीव कुरवाळीत राहिला,—!!!
आजमितीस काळ न आला,
सुवर्णकणांनी दिवस मढला,
जणू स्वप्नांच्या दुनियेतला,
राजकुमारच दौडत आला,–!!!
पाहून त्यांना स्तब्ध होता,
नजरेचा तीरही खिळला,
शिकारीस शिकारी आला,
मात्र स्वतःच शिकार जाहला,–!
© हिमगौरी कर्वे
Leave a Reply