गर्भारपणाचे नऊ महिने संपल्यानंतर प्रसूती होऊन सुदृढ माता आपल्या सुखरूप बाळाला घेऊन घरी जाते हे पाहणे स्त्रीरोगतज्ज्ञांचे ध्येय असते.
यासाठी युनिसेफसारख्या जागतिक संघटनांनी ‘चाइल्ड सर्व्हायवल’ आणि ‘सेफ मदरहूड’ असा कार्यक्रम राबविला. तत्त्वप्रणाली राबविली गेली.
आपल्यासारख्या विकसनशील देशात त्याची अमलबजावणी योग्य तऱ्हेने झाली तर एक लाख प्रसूतीमध्ये होणाऱ्या ४३० पेक्षा जास्त माता-मृत्यूंचे प्रमाण कमी होण्यास मदत होईल.
मातामृत्यू -अपमृत्यू असतात. गर्भधारणेपूर्वी स्त्री आरोग्यसंपन्न आहे याची खात्री करून घ्यायला हवी. दिवस राहिल्यानंतर शक्यतो लवकर डॉक्टरकडे जावे. नंतर दर महिन्याला सात महिन्यांपर्यंत नंतर दर पंधरा ‘ दिवसांनी आणि नवव्या महिन्यात दर आठवड्याला जावे. काही त्रास होत असल्यास यापेक्षा जास्त वेळा जावे.
माता सुदृढ असेल तर बाळ चांगले होते हे लक्षात ठेवावे. गर्भवतीचा इतिहास, वजन, रक्तदाब इत्यादि गोष्टींची नोंद केली जाते. तिचा रक्तगट, तिच्या रक्तातील हिमोग्लोबीनचे प्रमाण पाहिले जाते. लघवी तपासतात. स्तनपानासाठी स्तन योग्य आहेत हे पाहिले जाते. गर्भाची वाढ योग्य होते हे पाहण्यासाठी हल्ली विशेष तंत्रसाधने व तपासण्या उपलब्ध झालेल्या आहेत. त्या पुढीलप्रमाणे आहेत-
१) सोनोग्राफी २) वारजनित पेशी चिकित्सा ३) मराठी विज्ञ गर्भजल चिकित्सा ४) विशिष्ट रक्तविवरण चाचण्या ५) फिटोस्कोपी ६) एन. एस. टी. इलेक्ट्रॉनिक यंत्राने बाळाच्या हृदयाची तपासणी ७) कलर डॉप तपास इत्यादि.
अर्थात या सर्वच तपासण्या करण्याची जरुरी सर्वच स्त्रियांना असते असे नाही.
आवश्यकता असेल तरच हे तपास करण्यास सांगितले जाते.
डॉ. मन्दाकिनी पुरंदरे
-मराठी विज्ञान परिषद
Leave a Reply