“प्रेम कुणावर करावं?
प्रेम कुणावरही करावं..
ज्याला तारायचं,
त्याच्यावर तर करावंच,
पण ज्याला मारायचं,
त्याच्यावरही करावं,
प्रेम कुणावरही करावं
प्रेम..
योगावर करावं,
भोगावर करावं,
आणि त्याहुनही अधिक,
त्यागावर करावं..”
प्रेम कुणावरही करावं..
सजीवांवर करावं..,निर्जीवांवर करावं हे सांगणाऱी आपली संस्कृती..!
असेही आपल्या देशात वर्षाचे दिवस ३६५ असले तरी ‘दिन’ पांच-सहाशे तरी असतील..त्यात आणखी एका अनावश्यक ‘डे’ची काय गरज आहे?
आपल्याला गरज आहे ती आपली उदात्त संस्कृती जाणून घ्यायची..त्यातील प्रेमाची महती समजण्याची
कारण प्रेम आहे माणसाच्या संस्कॄतीचा सारांश..
त्याच्या इतिहासाचा निष्कर्ष आणि..
भविष्यकालातील त्याच्या अभ्युदयाची एकमेव आशा..!
— गणेश साळुंखे
Leave a Reply