प्रेम, मोह असे मनी सद्भावना
नयनी आणते पाणी
क्रोध, लोभ असे मनी वासना
माणूस होतो प्राणी
माणूस होण्या कीर्ती सांगे
नदी तळाचे पाणी
पण माणूस म्हणोनि जगण्यासाठी
शुद्ध लागते वाणी….
अर्थ–
प्रेम, मोह असे मनी सद्भावना, नयनी आणते पाणी, क्रोध, लोभ असे मनी वासना, माणूस होतो प्राणी
(हळव्या गोष्टी ना अश्रूंची किंमत मोजावी लागते पण ते अश्रू सुखाश्रु देखील असतात,तर निर्लज्ज झाल्यावर तेच अश्रू आपल्या मूळे इतरांच्या डोळ्यात येतात पण ते सुखाश्रु असतीलच याची ग्वाही नाही, याला जोड ही विचारांची, संस्कारांची आणि तुम्ही समाजाकडे पहात असलेल्या दृष्टीची असते.)
माणूस होण्या कीर्ती सांगे, नदी तळाचे पाणी, पण माणूस म्हणोनि जगण्यासाठी, शुद्ध लागते वाणी.
(उथळ विचारांच्या व्यक्तीचे रूप हे सर्वांना पटकन लक्षात येते, पण जो माणूस स्वार्थ न बघता मनापासून चांगले कार्य करीत असतो त्याला प्रसिद्धी मिळता मिळत नाही कारण तो नदी तळातल्या शांत प्रवाहाप्रमाणे आपले कार्य करीत असतो. समर्थ म्हणतात की चांगला माणूस होण्यासाठी आधी जिभेवर नियंत्रण ठेवणे, असणे फार महत्वाचे असते. कारण माणूसपण हे आपल्या शब्दांमधून जास्त काळ टिकते आणि ठरते सुद्धा.)
— सुमंत परचुरे.
Leave a Reply