तसेंच वागा इतरजणांशी, वाटत असते ,तुमच्या मनीं ।
अपेक्षा करता प्रेमाची, सदैव इतरांकडूनी…१,
सहानूभुतीचा शब्द लागतो, दैनंदिनीच्या जीवनीं ।
क्षणा क्षणाला भासत असते, जीवन तुमचे अवलंबूनी…२,
प्रेम वाटतां इतरांना, परत मिळते तेच तुम्हांला ।
प्रेम नाण्याचे मूल्य जाणूनी चलनांत ठेवा हर घडीला…३,
याच नाण्यांनीं काम बनते, चटकन सारे बघा कसे ।
दोन मनें सांधली जाऊनी, आनंद सर्वत्र दिसत असे…४,
राग लोभ हे शत्रू आपले, घालऊनी द्यावे तुम्ही त्यांना ।
प्रेम नाण्याची मदत घेता, सहज जमेल हे सर्वांना…५,
डॉ. भगवान नागापूरकर
९००४०७९८५०
Leave a Reply