नवीन लेखन...

प्रेमाच्या वाटेवर – भाग १

प्रतिभा संथ पावले टाकत विजयच्या खोलीच्या दिशेने चालत होती. खोली जवळ येताच प्रतिभाने खोलीचा दरवाजा हळूच आत ढकलला आणि क्षणभर ती स्तब्ध झाली. समोरच्या बिछाण्यावर विजय शांत झोपलेला होता. त्याचा चेहरा नेहमी सारखाच आनंदी आणि टवटवीत दिसत होता. त्याचे लांब सडक काळे केस अंथरुणावर आस्थाव्यस्थ पसरलेले होते. त्याचा एकूणच थाट परिकथेतील एखादा राजकुमार त्याच्या महालातील मखमली गादीवर झोपल्यासारखाच होता. न राहून प्रतिभेच्या मनात विचार आला याला जागं न करता असचं तासन – तास एकटक त्याच्याकडे पहात राहावं. पण आता ते शक्य नव्हतं कारण विजय आणि प्रतिभा यांच्यातील प्रेमाचं आणि मैत्रीच नातं आता बदललं होतं. आता ती त्याची वहिनी झाली होती.

प्रतिभाने स्वतःला सावरले आणि ती विजयच्या बिछाण्याच्या दिशेने चोर पावले टाकू लागली. पावलागणिक तिच्या हृदयाची धडधड वाढत होती. विजयच्या जवळ येताच तिने चहाचा कप बेडच्या बाजूलाच असलेल्या टेबलावर ठेवला आणि तिने विजयच्या उघड्या दंडाला हलूच हात लावला आणि तिच्या मनात एक अनोळखी लहर निर्माण होऊन गेली. पण तिच्या अनोळखी स्पर्शाने विजय दचकून जागा झाला. त्याने डोळे उघडले तर प्रतिभा त्याच्याकडे कुतूहलाने पहात होती. स्वतःला सावरत विजय तिला म्हणाला, “वहिनी तू कशाला आलीस? आईला पाठवायचं ना? नाहीतरी मी अलार्म लावलाच होता थोड्यावेळाने मी उठलोच असतो असाही!”

चहा हातात घेत विजय प्रतिभाला धन्यवाद!! म्हटल्यावर प्रतिभा तिच्या खोलीत तिच्या नवऱ्यालाच अर्थात अजयला उठवायला गेली. अजयही बिछाण्यावर विजयसारखाच शांत झोपला होता पण त्याच्याकडे मात्र एकटक पहात रहावं असं तिला अजिबात वाटत नव्हतं. तिने त्याच्या जवळ जाऊन त्याला गदागदा हलवत अहो!उठा ना! म्हणत जाग केलं. झोपेतून जाग होताच अजयने प्रेमाने तिला आपल्या मिठीत भरून घेतले त्या मिठीतुन मोकळं होण्याचा तिने निरर्थक प्रयत्न केला. प्रतिभाच्या सासूबाईंनी प्रतिभाला स्वयंपाकघरातून हाक मारताच अजयने तिला आपल्या मिठीतून मोकळं केलं आणि ती साडी नीट करत स्वयंपाकघराच्या दिशेने धावली.

सासूबाईंनी चहाचा कप भरूनच ठेवला होता तो त्यांनी तिला अजयला नेऊन द्यायला सांगितला. विजय नुकताच अंघोळ करून बाहेर हॉलमध्ये केस पुसत खुर्चीत बसला होता. तोच त्याची नजर समोरून चहा घेऊन येणाऱ्या प्रतिभावर स्थिरावली. तिच्याकडे बघता बघता त्याचा टॉवेल हातातून खाली पडला जो प्रतिभाने उचलून त्याच्या हातात देताच विजय धन्यवाद! म्हणताच प्रतिभा लडिवाळ रागात त्याला म्हणाली, “विजय हे असं सारख उठसुठ आता धन्यवाद! म्हणण्याची गरज नाही आता मी तुझी मैत्रिण राहिले नाही तर सख्खी वहिनी झाली आहे.”त्यावर विजय आपल्या दोन्ही हाताने आपले कान पकडून गालात गोड हसत ओठातल्या ओठात सॉरी म्हणाला. त्यावर गालातल्या गालात हसत प्रतिभा तिच्या खोलीत गेली.

अजय अंघोळ करून तयार होऊन बसला होता. तिने त्याच्या हातात कप देताच त्याने चहाचा एक झुरका मारला आणि कप प्रतिभाचा हातात दिला प्रतिभानेही चहाचा एक झुरका मारून कप पुन्हा अजयच्या हातात दिला. अजय चहा पीतच होता इतक्यात त्याची आई आत येऊन त्याला म्हणाली, “अजय आज जरा लवकर घरी ये आणि प्रतिभाला घेऊन तुझ्या मामाकडे जा त्यांनी तुम्हाला जेवनाच आमंत्रण दिले आहे. खरंतर आपल्या सर्वाना बोलावलं होत पण आज खूपच धावपळ आहे आणि बरीच कामे आटपायची आहेत. त्या निमित्ताने प्रतिभाची रमेश बरोबर ओळख होईल नाहीतर तो आपल्या वहिनीला पहायला खास काही आपल्याकडे येणार नाही.”

आई निघून गेल्यावर प्रतिभाने अजयला प्रश्न केला, “हे रमेश कोण?” त्यावर अजय म्हणाला, “रमेश माझा मावस भाऊ आहे.” अजय ऑफिसला निघताच प्रतिभा त्याला दरवाजापर्यंत सोडायला गेली आणि टाटा करून सासूबाईंना स्वयंपाकात मदत करण्यासाठी स्वयंपाकघरात गेली. दरम्यान विजयही तयार होऊन त्याच्या कामाला निघून गेला. प्रतिभा सासूबाईंसह स्वयंपाक घरात असताना दारावरची बेल वाजली. प्रतिभाने धावत जाऊन दरवाजा उघडला. दरवाजा उघडताच एका तरुणीने वहिनी म्हणत तिला मगर मिठी मारली. प्रतिभा खरं तर तिला ओळखत नव्हती पण ती वहिनी म्हणाली म्हणजे ती आपली नणंद आहे हे प्रतिभेच्या लक्षात आले होते. तिला बसायला सांगून प्रतिभा स्वयंपाक घरात तिच्या सासूबाईंना बोलवायला गेली. सासूबाई बाहेर येताच मावशी म्हणत त्या तरुणीने त्यांना मिठी मारली ती मिठीतुन मोकळी होताच सासूबाई प्रतिभाला म्हणाल्या, “ही माझ्या बहिणीची मुलगी नीलम! तुमच्या लग्नाच्या वेळी तिची बारावीची परीक्षा सुरु होती म्हणून नाही येऊ शकली लग्नाला! तू बस तिच्या सोबत मी स्वयंपाकाच काय ते बघते. आणि हो नीलम आता जेवुनच जा!” त्यावर नीलमने मानेनेच होकार दिला.

प्रतिभा निलमच्या समोरच एक खुर्ची घेऊन बसली आणि प्रेमाने नीलमला म्हणाली, “काय बोलता नणंदबाई?” त्यावर नीलम म्हणाली, “तुम्हीच म्हणा वहिनीसाहेब?” त्यावर प्रतिभा नीलमला म्हणाली, “काय मग! बारावी झाल्यावर पुढे काय करायचा विचार आहे?” त्यावर नीलम विनोदाने म्हणाली, “माझा तर लग्न करून संसार थाटण्याचा विचार होता पण घरच्यांचा आग्रह म्हणून पुढे शिकायचं म्हणते. बरं वहिनी तू किती शिकलीस?” या नीलमच्या प्रति प्रश्नाला उत्तर देत प्रतिभा म्हणाली, “मी बारावी नंतर नाही शिकले शिक्षण सोडून आता पाचएक वर्षे झाली. बरं तुझा आवडता विषय कोणता होता?” त्यावर प्रतिभा मराठी म्हणताच आश्चर्यचकित होत नीलमने पुन्हा प्रश्न केला, “त्यात काय असतं आवडण्यासारखं?” त्यावर प्रतिभा शांतपणे म्हणाली,”कविता!” त्यावर नीलम म्हणाली, “वहिनी, तू कवयत्री वगैरे नाहीस ना?” त्यावर प्रतिभा म्हणाली, “मला कविता लिहायला आणि वाचायला आवडतात छंद म्हणून! आजच मी वर्तमानपत्रात रमेश जाधव यांची एक छान कविता वाचली.” त्यावर नीलम उत्साही होत म्हणाली, “कोणाची? रमेश जाधवची?? तो माझा दादा आहे म्हणजे माझ्या मामाचा मुलगा आहे म्हणजे तुझा दीर आहे. हल्ली तो कोणाशी फारसा बोलत नाही पण तुझ्याशी नक्की बोलेल कारण तुम्ही समप्रेमी आहात ना!” बोलता बोलता नीलमचे डोळे दाटून आले.

बोलता बोलता डोळे पुसत चेहऱ्यावर खोटं हसू आणत विषय बदलत नीलमने प्रतिभाला प्रश्न केला, “तुमचा हनीमून कसा झाला?” त्यावर प्रतिभा तिच्या गालावर चापट मारत म्हणाली, “लहान मुलांनी असे चावट प्रश्न विचारायचे नसतात!” तोच आईनी जेवायला चलाचे फर्मान सोडले आणि तिघी मनसोक्त गप्पामारत जेवण आटपून टीव्ही पहायला बसल्या इतक्यात नीलमला फोन आल्यावर ती दोघींचा निरोप घेऊन गडबडीत निघून गेली.

— निलेश बामणे.

Avatar
About निलेश बामणे 421 Articles
Poet & Writer Editor - Marathi magzine Sahitya Upekshitanche
Contact: Facebook

Be the first to comment

Leave a Reply

Your email address will not be published.


*


महासिटीज…..ओळख महाराष्ट्राची

गडचिरोली जिल्ह्यातील आदिवासींचे ‘ढोल’ नृत्य

गडचिरोली जिल्ह्यातील आदिवासींचे

राज्यातील गडचिरोली जिल्ह्यात आदिवासी लोकांचे 'ढोल' हे आवडीचे नृत्य आहे ...

अहमदनगर जिल्ह्यातील कर्जत

अहमदनगर जिल्ह्यातील कर्जत

अहमदनगर शहरापासून ते ७५ किलोमीटरवर वसलेले असून रेहकुरी हे काळविटांसाठी ...

विदर्भ जिल्हयातील मुख्यालय अकोला

विदर्भ जिल्हयातील मुख्यालय अकोला

अकोला या शहरात मोठी धान्य बाजारपेठ असून, अनेक ऑईल मिल ...

अहमदपूर – लातूर जिल्ह्यातील महत्त्वाचे शहर

अहमदपूर - लातूर जिल्ह्यातील महत्त्वाचे शहर

अहमदपूर हे लातूर जिल्ह्यातील एक महत्त्वाचे शहर आहे. येथून जवळच ...

Loading…

error: या साईटवरील लेख कॉपी-पेस्ट करता येत नाहीत..