भारतीय कायद्याप्रमाणे मुलीचे लग्नाचे वय १८ वर्षे आणि मुलाचे २१ वर्षे आहे. लग्नाच्या वेळी वधु-वर सुदृढ असावेत. विशेषतः मुलीच्या प्रकृतीची जास्त काळजी/ लग्नानंतर मातृत्व येणार- त्यासाठी मुलीची, शारीरिक अवस्था चांगली असणे जरुरीचे असते. गर्भारपणामध्ये मुलीच्या शरीरात पुष्कळ बदल होतात.
श्वसनसंस्था, रुधिराभिसरण, पचनसंस्था इत्यादी संस्थांना जास्त काम करावे लागते. मातेच्या पोटात बाळ वाढते ते आईकडून होणाऱ्या अन्नाच्या पुरवठ्यावर बाळाला अक्षरशः प्राणवायू मातेच्या रक्तातून मिळतात. त्यासाठी सर्व संस्थांना कार्यात वाढ करावी लागते. बाळ वाढू लागले की, मातेचे पोट मोठे होते आणि गुरुत्वाकर्षणाचा तोल राखण्यासाठी तिच्या मज्जासंस्था आणि स्नायूंवर ताण पडतो.
नंतर येणारी प्रसूती ! आणि बालसंगोपन हे सर्व करण्यासाठी आई निरोगी असावी. स्त्री गर्भवती झाल्यावर आजारपण येणार नाही याची काळजी घ्यावी. पण काही गंभीर अथवा चिवट आजार असेल, तर डॉक्टरांचे हात बांधले जातात, स्त्रीला बरे करण्यासाठी काही वेळा तीव्र औषधे देण्याची जरुरी असते. पण त्याचा गर्भावर विपरीत परिणाम होऊ शकतो अशी परिस्थिती टाळण्यासाठी गर्भारपण येण्यापूर्वीच स्त्रीची वैद्यकीय तपासणी करून घ्यावी. मुलीचे लग्न करायचे ठरले की डॉक्टरांकडून मुलीला तपासून घ्यावे. हृदय, फुफ्फुस, इ. अवयव नीट कार्य करतात हे पाहावे. मुलीची मासिकपाळी नियमित असेल तर जननसंस्थेचे कार्य व्यवस्थित आहे असे समजायला हरकत नाही.
रक्त, लघवी यांचा तपास केल्यास काही रोगांचे अस्तित्व नाही हे कळू शकते. क्षयासारखे औषधांनी बरे होणारे आजार बरे झाल्यावरच मुलीचे लग्न करावे. रक्तगट माहीत असावा म्हणून तपासावा.
रक्तामध्ये हिमोग्लोबीनचे प्रमाण पुरेसे नसल्यास हिमोग्लोबीन वाढवायचे आणि नंतर लग्न करायचे. मराठी विज्ञान परिषद वैवाहिक जीवन, लैंगिक संबंध, कुटुंबनियोजनाची साधने 956* याबद्दल माहिती विवाहापूर्वीच डॉक्टरांकडून जाऊन घ्यावी.
नव्या जीवनप्रणालीत काय जबाबदारी आहे हे समजून त्यासाठी तयारी करून संसार सुरू केला म्हणजे जीवन सुखाचे होईल, समुपदेशकांची मदतही त्यासाठी घेता येईल. शरीरप्रकृती उत्तम असल्यास जबाबदार पत्नीत्व आणि मातृत्व पेलणे सोपे जाईल.
-डॉ. मंदाकिनी पुरंदरे
मराठी विज्ञान परिषद
Leave a Reply