मुरलीधरा वाजीव रे मुरली
जीवसृष्टी सारी आसुसलेली…
सुर वेणुचे दशदिशा उजळती
खगगण, मंजुळ स्वरे गाती…
गोकुळीची जित्राबे गोधूली
तुझ्याच ओढ़ी हंबरत येती…
झुळझुळती मोदे वृक्षवल्ली
मीरा, राधा भक्तिगीत गाती…
स्वर तव मुरलीचे मनोहारी
प्रेमस्पर्शे जीवास जगविती
— वि.ग.सातपुते. (भावकवी)
(9766544908)
रचना क्र. २८०
२/११/२०२२
Leave a Reply