नवीन लेखन...

प्रेरणा अंध नसतें

अंधांना नेहमीच मार्ग दाखवावा लागतो असे नाही.अनेक अंधानी जगाला जगायला व जगवायला शिकविले.अंध असूनही तिने देशासाठी पदक जिंकले, तरीही देशातील जनता रीलवर नाचणाऱ्या पोरींनाच लाईक करणार.


कांचनमाला विनोद पांडे-देशमुख ही एक आंतरराष्ट्रीय दर्जाची भारतीय जलतरणपटू आहे. कांचनमाला आंधळी आहे, पण अंधत्वामुळे आलेल्या मर्यादा झुगारून तिने जिद्दीने वयाच्या १० व्या वर्षांपासून पोहायला सुरुवात केली. ती केवळ ८ दिवसात पोहणे शिकली व तिने खुल्या गटात भाग घेऊन आपली गुणवत्ता दाखविली. वयाच्या ११वे वर्षी तिने सात किमी समुद्री अंतर १४ मिनिटात पार करून लिम्का बुकमध्ये नाव नोंदविले. तिने मेक्सिको येथे झालेल्या पॅरा जागतिक जलतरणस्पर्धेत, तिच्या गटात सुवर्णपदक जिंकले. तिने हे सुवर्णपदक २०० मीटर वैयक्तिक मिडले गटात राहून मिळविले.ती नेत्रहीन आहे.कांचनमाला भारताच्या महाराष्ट्र राज्यातल्या बुलढाणा जिल्ह्याच्या चिखली तालुक्यातील एकलारा येथे राहते.

पूर्णतः अंध असलेल्या कांचनमाला पांडे हिने आपल्या धैर्याने, संघर्षाने आणि अतूट इच्छाशक्तीच्या जोरावर देशासाठी एक अमूल्य प्रेरणा असल्याचे सिद्ध केले आहे. महाराष्ट्रातील नागपूर येथील रहिवासी असलेल्या कांचनमालाने भारतीय पॅरा-स्विमिंगमध्ये असे स्थान मिळवले आहे, जे साधणे सामान्य माणसालाही कठीण आहे. आयुष्यात अंधार असूनही देशासाठी अनेक पदके जिंकून खरा प्रकाश माणसाच्या धैर्यात असतो हे त्यांनी सिद्ध केले. कांचनमालाने 2017 मध्ये मेक्सिकोमध्ये झालेल्या जागतिक पॅरा एस्विमिंग चॅम्पियनशिपमध्ये रौप्य पदक जिंकून इतिहास रचला. आंतरराष्ट्रीय पॅरा-स्विमिंग चॅम्पियनशिपमध्ये पदक जिंकणारी ती भारतातील पहिली महिला जलतरणपटू आहे. तिच्या विजयामुळे ती केवळ तिच्या शहरात आणि देशातच नव्हे तर संपूर्ण जगात प्रेरणास्थान बनली आहे. तिच्या संघर्षाची कथा प्रेरणांनी भरलेली आहे. आर्थिक अडचणींचा सामना करूनही कांचनमालाने तिची स्वप्ने साकार केली. तिच्या कुटुंबीयांनी आणि जवळच्या मित्रांनी तिला प्रत्येक पावलावर साथ दिली, पण तिची मेहनत आणि जिद्दीने तिला हि उंची गाठण्यास मदत केली.कोणतेही शारीरिक व्यंग असले तरी, मनात जिद्द असेल, तर कशावरही मात करता येते.तिचे वडील पेशाने हॉकी खेळाडू असल्याने घरात खेळाविषयीचे वातावरण होतेच. आपली मुलगी अंध जन्मली म्हणून काय झालं, ती खेळाडू झालीच पाहिजे पण असं त्यांचं मत होतं.वयाच्या अवघ्या १०व्या वर्षापासून हनुमान व्यायाम प्रसारक मंडळाच्या जलतरण तलावात तिने पोहायला सुरुवात केली. डोळस व्यक्तीलाही पोहणे शिकण्यासाठी बऱ्यापैकी कालावधी लागतो. मात्र, कांचनमाला अवघ्या आठ दिवसांत व्यवस्थित पोहायला शिकली. यावरूनच तिच्या क्षमतेचा अंदाज घेऊन वडिलांनी तिचा सराव सुरू ठेवला.सराव चालू असताना किंवा एखाद्या स्पर्धेत भाग घेतल्यानंतर इतर स्पर्धक एका दिशेने पोहतात. मात्र, कांचन अंध असल्याने ती वाकडी-तिकडी पोहत अंतर पार करायची. यानंतर मात्र तिच्या वडिलांनी आणि प्रशिक्षकांनी २००२ साली ’सी स्विमिंग’ करण्याचा निर्णय घेतला.कांचनने सन रॉक ते गेट वे ऑफ इंडिया हे पाच किलोमीटरचे अंतर अवघ्या १ तास १४ मिनिटांमध्ये पूर्ण करत लिम्का बुकमध्ये नोंद केली. डोळस व्यक्तीपेक्षा कमी वेळेत सन रॉक ते गेट वे ऑफ इंडिया हे अंतर पार केल्यानंतर कांचनमाला देशभरात चर्चेत आली. विशेष म्हणजे, कांचन अंध असूनदेखील आतापर्यंत सर्वसामान्य गटातून स्पर्धा लढत होती. ऐतिहासिक वेळेत हे अंतर पार केल्यानंतर तिला कळलं की, अंध व्यक्तींसाठीदेखील स्वतंत्र स्पर्धा असते. त्यानंतर तिने याकडे करिअर म्हणून पाहिले. त्यानंतर आतापर्यंत तिने कधीच मागे वळून पाहिले नाही. एकीकडे पोहण्याचा सराव सुरू असला तरी, अभ्यासाकडे तिने कधीच दुर्लक्ष केलं नाही. म्हणूनच ती दहावी व बारावीमध्ये ७५ टक्क्यांपेक्षा अधिक गुण मिळवत उत्तीर्ण झाली. अभ्यास व सराव करत असताना ती बँकिंगची तयारीदेखील करत होती. प्रत्येक गोष्ट मिळविण्यासाठी तिला संघर्ष करावा लागला होता. म्हणूनच ती म्हणते, “संघर्षाशिवाय यश मिळत नाही आणि सहजासहजी मिळालेल्या गोष्टीची आपल्याला किंमत नसते. म्हणूनच आयुष्यात संघर्ष हवाच…”कांचनमालाने अंधांच्या ‘राष्ट्रीय जलतरण चॅम्पियनशिप’मध्ये आतापर्यंत १०० हून अधिक सुवर्णपदकांची कमाई केली आहे. दहांहून अधिकवेळा आंतरराष्ट्रीय स्तरावर भारताचे प्रतिनिधीत्व केले. यामध्ये तिने अनेक पुरस्कारांवर व पदकांवर आपली मोहर उमटवली आहे. मेक्सिको येथे पार पडलेल्या ‘पॅरा वर्ल्ड स्वीमिंग चॅम्पियनशिप-२०१७’ स्पर्धेत कांचनमालाने भारताला पहिले सुवर्ण मिळवून दिले होते. या स्पर्धेतसुवर्णपदक मिळवणारी ती भारताची पहिली जलतरणपटू ठरली होती. तिच्या या ऐतिहासिक कामगिरीसाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी तिला १५ लाख रुपयांचे बक्षीसही जाहीर केले होते. सराव व महाविद्यालयाचा अभ्यास करत असताना २०१५ साली रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाच्या परीक्षेत ती उत्तीर्ण झाली. तेव्हापासून ती रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाच्या नागपूर शाखेत साहाय्यक पदावर कार्यरत आहे. ते म्हणतात ना, मनावर घेतले, तर जगात कोणतीच गोष्ट अशक्य नाही, असेच कांचनमालाने शिक्षण, खेळ आणि बँकिंग परीक्षेचा हा प्रवास अगदी थक्क करणारा… जन्मांध असूनही तिचा हा प्रेरणादायी प्रवास डोळस व्यक्तींसाठी नक्कीच प्रेरणादायी ठरणारा आहे.

चांगल्या सवयी,जिद्द, निश्चय

या प्रेरणेच्या पायऱ्याच आहेत.

डॉ.अनिल कुलकर्णी

डॉ. अनिल कुलकर्णी
About डॉ. अनिल कुलकर्णी 36 Articles
डॉ. अनिल कुलकर्णी हे पुणे येथे स्थायिक असून ते शिक्षण क्षेत्रात कार्यरत आहेत. त्यांची ३ पुस्तके प्रकाशित झाली आहेत.

Be the first to comment

Leave a Reply

Your email address will not be published.


*


महासिटीज…..ओळख महाराष्ट्राची

गडचिरोली जिल्ह्यातील आदिवासींचे ‘ढोल’ नृत्य

गडचिरोली जिल्ह्यातील आदिवासींचे

राज्यातील गडचिरोली जिल्ह्यात आदिवासी लोकांचे 'ढोल' हे आवडीचे नृत्य आहे ...

अहमदनगर जिल्ह्यातील कर्जत

अहमदनगर जिल्ह्यातील कर्जत

अहमदनगर शहरापासून ते ७५ किलोमीटरवर वसलेले असून रेहकुरी हे काळविटांसाठी ...

विदर्भ जिल्हयातील मुख्यालय अकोला

विदर्भ जिल्हयातील मुख्यालय अकोला

अकोला या शहरात मोठी धान्य बाजारपेठ असून, अनेक ऑईल मिल ...

अहमदपूर – लातूर जिल्ह्यातील महत्त्वाचे शहर

अहमदपूर - लातूर जिल्ह्यातील महत्त्वाचे शहर

अहमदपूर हे लातूर जिल्ह्यातील एक महत्त्वाचे शहर आहे. येथून जवळच ...

Loading…

error: या साईटवरील लेख कॉपी-पेस्ट करता येत नाहीत..