नवीन लेखन...

प्रेशर कुकर

जर तुम्हाला बटाटे शिजवायचे असतील आणि तुम्ही भांड्यात पाणी घेऊन ते शिजवायला ठेवलेत तर अर्धा तास तरी लागेल. तेच बटाटे प्रेशर कुकरमध्ये घालून शिजवले तर आठ ते १० मिनिटात उकडता येतील.

पाणी उकळताना जी क्रिया घडते ती यात महत्त्वाची असते. पाणी उकळते तेव्हा त्याचे रेणू इतकी ऊर्जा मिळवतात, ज्यामुळे ते द्रवातून सुटून वाफ तयार करतात. पाणी १०० अंश सेल्सियस तापमानाला उकळते हे आपल्याला माहीत आहे. जेव्हा आपण उंच पर्वतावर जाऊन अन्न शिजवण्याचा प्रयत्न करू त्यावेळी हवेचा दाब कमी झाल्याने पाण्याचा उत्कलन बिंदू कमी होऊन पाणी १०० अंश सेल्सियसच्या अगोदरच म्हणजे ७० अंश सेल्सियस तापमानाला उकळायला लागेल. माऊंट एव्हरेस्ट किंवा अतिउंच पर्वतांवर समुद्रसपाटीपेक्षा एक तृतीयांशाने दाब कमी झाल्याने हे घडून येते.

प्रेशर कुकरमध्ये नेमके याउलट घडते. प्रेशर कुकरला गॅसकेट असते, त्यामुळे त्यातून उकळलेल्या पाण्यामुळे निर्माण झालेली वाफ बाहेर जात नाही. तसेच जशी ही वाफ साठते तसा दाब वाढत जाऊन पाण्याचा उत्कलन बिंदू वाढतो ते नेहमीपेक्षा जास्त तापमानाला उकळू लागते. १५ पीएसआय इतक्या दाबामुळे पाणी २१२ फॅरनहिटऐवजी २५२ अंश फॅरनहिट तापमानाला उकळते. त्यामुळे कुकरमध्ये अन्न लवकर शिजते. यात वाफेने निर्माण होणाऱ्या दाबाचा खुबीने उपयोग केला असला तरी दाब अती वाढूनही चालत नाही, त्यासाठी सेफ्टी व्हॉल्व्हमधून थोडी वाफ बाहेर टाकली जाते. त्यामुळे दाब नियंत्रित होतो.

प्रेशर कुकर हे साधन साधे सोपे वाटत असले तरी कुकर लावताना काही चुका झाल्या तर स्फोट होऊन अगदी प्राणहानीही होऊ शकते. त्यामुळेच अत्यंत काळजीपूर्वक हाताळणी आवश्यक असते. कुकरची शिटी, गॅसकेट लावली आहे ना हे बघणे गरजेचे असते. सेफ्टी व्हॉल्व्हच्या ठिकाणी काही अन्नकण अडकले असल्यास ते साफ करणे गरजेचे असते. अनावश्यक दाब कमी करण्यासाठी वाफ बाहेर टाकण्याच्या प्रक्रियेत अडथळा येऊ शकतो.

प्रेशर कुकर पहिल्यांदा बनवला तो फ्रेंच गणितज्ज्ञ डेनिस पॅपिन यांन १६७९ मध्ये त्यांनी एका लोखंडी भांड्याला पक्के झाकण बनवून हा प्रयोग यशस्वी केला होता. कुकरला त्यावेळी डायजेस्टर हा शब्द वापरला जात असे. या शोधामुळे पॅपिन यांना रॉयल सोसायटीचे सदस्यत्व मिळाले, त्यांनी रॉयल सोसायटीच्या सभासदांना अन्न शिजवून दाखवले होते. पॅपिन यांनी नंतर सेफ्टी व्हॉल्व्हही तयार केला होता.

 

Be the first to comment

Leave a Reply

Your email address will not be published.


*


महासिटीज…..ओळख महाराष्ट्राची

गडचिरोली जिल्ह्यातील आदिवासींचे ‘ढोल’ नृत्य

गडचिरोली जिल्ह्यातील आदिवासींचे

राज्यातील गडचिरोली जिल्ह्यात आदिवासी लोकांचे 'ढोल' हे आवडीचे नृत्य आहे ...

अहमदनगर जिल्ह्यातील कर्जत

अहमदनगर जिल्ह्यातील कर्जत

अहमदनगर शहरापासून ते ७५ किलोमीटरवर वसलेले असून रेहकुरी हे काळविटांसाठी ...

विदर्भ जिल्हयातील मुख्यालय अकोला

विदर्भ जिल्हयातील मुख्यालय अकोला

अकोला या शहरात मोठी धान्य बाजारपेठ असून, अनेक ऑईल मिल ...

अहमदपूर – लातूर जिल्ह्यातील महत्त्वाचे शहर

अहमदपूर - लातूर जिल्ह्यातील महत्त्वाचे शहर

अहमदपूर हे लातूर जिल्ह्यातील एक महत्त्वाचे शहर आहे. येथून जवळच ...

Loading…

error: या साईटवरील लेख कॉपी-पेस्ट करता येत नाहीत..