भ्रष्टाचार आणि लाचखोरी ही फक्त भारतातच नाही. हा रोग संपूर्ण जगात पसरलेला आहे.
आपलं काम साधं असो किंवा मोठं, गुंतागुंतीचं. टेबलाखालूनच काय, अगदी राजरोसपणे टेबलाच्या वरुनही लाच घेउन खिशात टाकणारे महाभाग आपल्या देशात आहेत.
साधं ड्रायव्हिंग लायसन्स, रेशन कार्ड, जन्म-मृत्यू दाखला काढायलाही लाच द्यायला लागते. सिग्नल तोडला तर द्या शंभरची नोट आणि चला पुढे… हे तर नेहमीचंच.
खरंतर कायद्यानुसार लाच घेणं हा तर गुन्हा आहेच पण लाच देणं हा सुद्धा गुन्हा आहे. लाच देण्यामागे बर्याचवेळा वेळ मारुन नेणे, स्वत:च्या फायद्याचे काम करुन घेणे असे उद्देश असतात. त्यामुळे याविषयी जाहीर भाष्य करण्यास कुणीही तयार नसते.
आता या भ्रष्टाचाराची आणि लाचखोरीची वाच्यता करण्याची सुविधा www.ipaidabribe.com या वेबसाइटने उपलब्ध करुन दिली आहे. या वेबसाईटवर तुम्ही कधी, कुणाला, कशासाठी लाच दिली याची कबुली देऊ शकता तेही तुमचे नाव गुप्त ठेवून. “जनाग्रह सेंटर फॉर सिटिजनशिप एंड डेमोक्रेसी” या संस्थेद्वारे हा उपक्रम चालविला जातो.
हीच वेबसाईट हिंदीमध्येही उपलब्ध आहे http://www.mainerishwatdi.com या ठिकाणी.
— पूजा निनाद प्रधान
Leave a Reply