नवीन लेखन...

कर्करोगाचा प्रतिबंध

बहुतांश कर्करोग माणसाची जीवनशैली, आवड-निवड, व्यसन, आहार, वातावरण, व्यवसाय इत्यादीत होणाऱ्या कर्करोगकारक संपर्कामुळे होतो. गेल्या चार दशकात कर्करोग निदानशास्त्र, वैद्यकशास्त्र, शल्यचिकित्सा व इतर उपचारपद्धती यात प्रचंड सुधारणा झाली. रोग प्रथमावस्थेत असताना रोगी प्रचलित प्रभावी उपचार पद्धतींमुळे संपूर्ण बरे होतात. रोगाचे द्वितीय किंवा तृतीय अवस्थेत निदान होते त्यांना आधुनिक उपचाराने काही वर्षे रोगमुक्त सुदृढ आयुष्याचे वरदान लाभते.

आज कर्करोगावर विजय मिळविण्याकरिता विज्ञानाच्या सर्व शाखा झटत आहेत. परंतु कर्करोग मुळातच होऊ नये यासाठीचे प्रयत्न मात्र प्रत्येक व्यक्तीने विचारपूर्वक करायला हवेत. धुराडी साफ करणाऱ्या मुलांना, कोळशाच्या काजळीत असलेल्या कर्करोगजन्य रसायनांच्या सतत संपर्कामुळे त्वचेचा कर्करोग होतो. या रोगाला प्रतिबंध करण्यासाठी या मुलांना काम झाल्यावर आंघोळ करण्याचे बंधन घालण्यात आले. या अतिशय साध्या व सोप्या उपायाने त्यांना होणाऱ्या त्वचेच्या कर्करोगास आळा बसला. आचरणातील बदल कर्करोगास प्रतिबंध घालू शकतो.

भारतात चाळीस टक्क्यांहून जास्त रोगी तंबाखूच्या व व्यसनामुळे कर्करोगाची शिकार बनतात. तंबाखू हा ३००० रसायनांचे मिश्रण आहे. यातील ३० रसायने कर्करोगजन्य आहेत. तंबाखूच्या धुरात तर ४००० निरनिराळी रसायने असून त्यातील ४० रसायनांमुळे कर्करोग होऊ शकतो हे वापरामुळे मुखाच्या आतील भाग, घसा, ओठ, स्वरयंत्र, मूत्राशय, अन्ननलिका, स्वादुपिंड, फुफ्फुस इत्यादी अवयवांचा कर्करोग होतो. अतिरेकी मद्यपानामुळे अन्ननलिका, यकृत इत्यादीचे कर्करोग होतात. तंबाखू व त्यापासून बनणारे पदार्थ, विडी-सिगरेट व मद्यसेवन यांच्या आहारी न गेल्यास कर्करोगाचे प्रमाण निम्म्याहून कमी होऊन या रोगास निश्चितपणे प्रतिबंध घालता येईल.

भारतीय जेवणात लिंबू, भाज्या, डाळी, कडधान्ये यांचा समावेश असतो. आजच्या धावपळीच्या जीवनात भरपूर, तेल, तूप, चरबीयुक्त पदार्थ खाण्याकडे वाजवीपेक्षा जास्त कल झाला आहे.
जेवणात तिखट व मसालेदार अन्नपदार्थांचा वापर अनारोग्यास आमंत्रण देतो. चरबीयुक्त पदार्थांच्या सेवनाने स्तनाचा कर्करोग होतो व अतिस्थूल व्यक्तींना मूत्रपिंड, आतडे, गर्भाशय यांचा कर्करोग होण्याचा संभव अधिक असतो. नियमित व्यायाम कर्करोगास प्रतिबंध करण्यासाठी महत्त्वाचा घटक आहे. कर्करोगाला प्रतिबंध घालण्यासाठी आपण स्वतःवर बंधन घालून आपल्या जीवनशैलीत बदल करायला हवेत.

डॉ. रजनी भिसे
मराठी विज्ञान परिषद

Be the first to comment

Leave a Reply

Your email address will not be published.


*


महासिटीज…..ओळख महाराष्ट्राची

गडचिरोली जिल्ह्यातील आदिवासींचे ‘ढोल’ नृत्य

गडचिरोली जिल्ह्यातील आदिवासींचे

राज्यातील गडचिरोली जिल्ह्यात आदिवासी लोकांचे 'ढोल' हे आवडीचे नृत्य आहे ...

अहमदनगर जिल्ह्यातील कर्जत

अहमदनगर जिल्ह्यातील कर्जत

अहमदनगर शहरापासून ते ७५ किलोमीटरवर वसलेले असून रेहकुरी हे काळविटांसाठी ...

विदर्भ जिल्हयातील मुख्यालय अकोला

विदर्भ जिल्हयातील मुख्यालय अकोला

अकोला या शहरात मोठी धान्य बाजारपेठ असून, अनेक ऑईल मिल ...

अहमदपूर – लातूर जिल्ह्यातील महत्त्वाचे शहर

अहमदपूर - लातूर जिल्ह्यातील महत्त्वाचे शहर

अहमदपूर हे लातूर जिल्ह्यातील एक महत्त्वाचे शहर आहे. येथून जवळच ...

Loading…

error: या साईटवरील लेख कॉपी-पेस्ट करता येत नाहीत..