नवीन लेखन...

आयर्लंडच्या पंतप्रधानपदी मराठमोळे लिओ वराडकर

ब्रिटिशांच्या जुलमातून भारत मुक्त व्हावा यासाठी तुरुंगवास सोसलेल्या वराड (ता. मालवण) येथील वराडकर कुटुंबाचा वंश असलेले लिओ वराडकर हे आज ब्रिटनचा भाग असलेल्या आयर्लंडच्या पंतप्रधान बनले आहेत. एन्डा केनी यांनी पंतप्रधानपद सोडल्यानंतर लागलेल्या निवडणुकीत लिओ यांचा मुख्य मुकाबला सीमोन कोवनी यांच्याशी झाला.

३८ वर्षीय लिओ यांचा राजकारणातील प्रवास खूप वेगवान आहे. ते पेशाने डॉक्टर आहेत. डबलीग हे त्यांच्या कर्तृत्वाचे मुख्य ठिकाण. सुरवातीला उपमहापौर, त्यानंतर आयर्लंडच्या मंत्रीमंडळात स्थान मिळवत तेथे वाहतूक, पर्यटन आणि क्रिडा हे मंत्रीपद तसेच आरोग्य आणि सामाजिक सुरक्षा मंत्रीपदावर त्यांनी प्रभावी काम केले. यामुळेच थेट पंतप्रधान पदाचे मुख्य दावेदार म्हणून त्यांच्याकडे पाहिले जात होते. लिओ यांचे मुळ घर मालवण तालुक्यातील वराड हे होय.
वराडकर कुटुंब हे या गावातील प्रतिष्ठीत मानले जाते. लिओ यांचे वडील अशोक यांचे प्राथमिक शिक्षण वराडलाच झाले. अत्यंत हुशार असलेल्या अशोक यांना त्यांच्या वडिलांनी शिक्षणासाठी मुंबईत नेले पुढे हे कुटुंब मुंबईतच स्थायिक झाले. अशोक यांनी शिष्यवृत्ती मिळवून वैद्यकीय शिक्षणासाठी १९६० मध्ये इंग्लड गाठले. तेथे शिक्षण पूर्ण केल्यानंतर त्यांनी वैद्यकीय सेवा सुरू केली. यातच त्यांची ओळख नर्स असलेल्या आयरिश वंशाच्या मिरीअम यांच्याशी झाली. त्या दोघांचा प्रेमविवाह झाला. त्यांना एकूण तीन मुले यातील सानिया आणि सोफिया या लिओ यांच्या मोठ्या बहिणी. ही तिन्ही भावंडे डॉक्टर आहेत. सानिया या तर आयर्लंडमधल्या सगळ्यात मोठ्या रुग्णालयात बालरोगतज्ञ म्हणून कार्यरत आहेत. लिओ यांना तसा फारसा राजकीय वारसा नाही. मात्र देशभक्तीचा खूप मोठा वारसा या कुटुंबाच्या मागे आहे. लिओ यांच्या वडिलांचे काका मधुकर वराडकर आणि मनोहर वराडकर हे स्वातंत्र्य संग्रामात अग्रेसर होते. त्यांनी ब्रिटीशांचे राज्य जावे म्हणून तुरुंगवासही भोगला. आयर्लंडमध्ये स्थायिक होवूनही वराडकर कुटुंबाने गावाशी असलेली नाळ तोडलेली नाही.

गावात त्यांचे वडीलोपार्जित घर, जमीन जुमला आहे. चारच वर्षापूर्वी त्यांनी नवे टुमदार घरही बांधले. हे दाम्पत्य दर दोन वर्षांनी धार्मिक कार्यक्रमांच्या निमित्ताने गावाकडे आवर्जुन येते. लिओ हे मात्र अद्याप वराडला आलेले नाहीत. २०११ मध्ये विश्व्चषक क्रिकेट स्पर्धेच्या निमित्ताने तत्कालीन आयर्लंडचे क्रिडामंत्री या नात्याने लिओ हे भारतात आले होते. यावेळी त्यांनी मुंबईला भेट दिली होती.

संजीव वेलणकर पुणे.
९४२२३०१७३३
संदर्भ. इंटरनेट

संजीव वेलणकर
About संजीव वेलणकर 4354 Articles
श्री. संजीव वेलणकर हे पुणे येथील केटरिंग व्यवसायिक असून ते विविध विषयांवर सोशल मिडियामध्ये लेखन करतात. ते १०० हून जास्त WhatsApp ग्रुप्सचे Admin आहेत. संगीत, आरोग्य, व्यक्तिचित्रे, पाककृती व इतर दिन विशेष या विषयांवर फेसबुकवर ही ते नियमितपणे लेखन करत असतात.
Contact: Facebook

1 Comment on आयर्लंडच्या पंतप्रधानपदी मराठमोळे लिओ वराडकर

Leave a Reply

Your email address will not be published.


*


महासिटीज…..ओळख महाराष्ट्राची

गडचिरोली जिल्ह्यातील आदिवासींचे ‘ढोल’ नृत्य

गडचिरोली जिल्ह्यातील आदिवासींचे

राज्यातील गडचिरोली जिल्ह्यात आदिवासी लोकांचे 'ढोल' हे आवडीचे नृत्य आहे ...

अहमदनगर जिल्ह्यातील कर्जत

अहमदनगर जिल्ह्यातील कर्जत

अहमदनगर शहरापासून ते ७५ किलोमीटरवर वसलेले असून रेहकुरी हे काळविटांसाठी ...

विदर्भ जिल्हयातील मुख्यालय अकोला

विदर्भ जिल्हयातील मुख्यालय अकोला

अकोला या शहरात मोठी धान्य बाजारपेठ असून, अनेक ऑईल मिल ...

अहमदपूर – लातूर जिल्ह्यातील महत्त्वाचे शहर

अहमदपूर - लातूर जिल्ह्यातील महत्त्वाचे शहर

अहमदपूर हे लातूर जिल्ह्यातील एक महत्त्वाचे शहर आहे. येथून जवळच ...

Loading…

error: या साईटवरील लेख कॉपी-पेस्ट करता येत नाहीत..