नवीन लेखन...

जगण्याची साधी सोप्पी तत्वे – भाग दहा

आयुर्वेदातील मार्गदर्शक तत्वे – क्रमांक चार

जगण्यासाठी औषध काम करत नाही.

काही गोष्टी आपण गृहीत धरतो, जसे एकदा रक्तदाब वाढला म्हणजे तो रोग मला झाला, एकदा कधीतरी रक्तात साखर मिळाली म्हणजे मला डायबेटीस झाला, एकदा रिपोर्ट मधे कोलेस्टेरॉल वाढलेले दिसले, आता जेवणातले तेल तूप नारळ शेंगदाणे बंद करायला हवेत. असंही नाही.

काही जणांना मात्र उगाचच औषधे घेण्याची हौस असते, किंवा मी औषधांशिवाय जगूच शकणार नाही अशी भीतीदेखील असते. आणि औषधे सुरू केली जातात. ही औषधे घेतली की मी बरा राहीन, आता मला काही होणार नाही, अशी भाबडी आशा असते.

कायमस्वरुपी औषध ही संकल्पना आयुर्वेदात नाही. जेव्हा रोग तेव्हा औषध. नाहीतर कशाला हवंय औषध ? रोग वाढू नये याकरीता औषध, रोग होऊ नये यासाठी औषध, प्रतिकार क्षमता वाढण्यासाठी औषध, रक्तवाढीसाठी औषध, कॅल्शियम सप्लीमेंटसाठी औषध, फूड सप्लीमेंटच्या नावाखाली औषधं हे केवळ बिझनेस फंडे आहेत, हे लक्षात घ्यावे.

ताप आला तर औषध जरूर घ्यावे. ताप येऊ नये यासाठी औषध घ्यायचे नसते. तसे चक्कर वगैरे येत असेल तर औषधांचा विचार करावा, पण चक्कर येऊ नये यासाठी चक्क औषधे ? रोग वाढला तर, हा भविष्याचा विचार अस्वस्थ करतो आणि भीतीपोटी कायमचे औषध सुरू होते.

औषध कसे असावे, यासाठी ग्रंथात एक प्रमाण दिले आहे. अल्पमोली बहुगुणी असावे. एका औषधाने दुसरा रोग निर्माण होऊ नये, किंवा एका औषधाचे दुष्परिणाम होऊ नयेत, याकरीता दुसरे, त्यासाठी तिसरे, चौथे औषध घ्यावे लागू नये.

एखादे औषध डोकेदुखीसाठी जरी घेतले तरी जाते पोटातच ! पोटात गेल्यावर फक्त जिथे डोके दुखते, त्या डोक्यामधेच ते जाते का ? नाही. सर्व रक्तात ते औषध मिसळून जाते. एखाद्या अवयवाला ठीक करण्यासाठी अन्य पाच सहा निरोगी अवयवांना आपण जास्ती कामाला लावत नाही का ?

ही औषधे शरीरातून बऱ्या बोलाने बाहेर पडतंच नाहीत. येतो तो मुक्कामीच येत असतो. आतडी, किडनी, यकृत, डोळे अशा नाजुक अवयवांना नाहक हा कचरा साठवून ठेवावा लागतो.

आपले संविधान असे म्हणते, शंभर आरोपी सुटले तरी चालतील, पण एका निरपराध्याला शिक्षा होता नये. इथे तर सगळं उलटंच चाललेलं आहे. एका दोषी अवयवाला निर्दोष करण्यासाठी बाकी सर्व अवयवांना जणु काही वेठीला धरले जातंय, त्यांच्यावर अन्याय करीत, एखाद्या अवयवाला सांभाळण्याची कसरत केली जातेय. बरं इथे जनरली प्रत्येक अवयव प्रत्येक डाॅक्टरने वाटून घेतलेले. प्रत्येक तज्ञ धडपडतोय, माझ्या अवयवाचाच मी विचार करणार ! बाकीचं तुमचं तुम्ही बघा !

कुणी कुणाचे नाही राजा,
कुणी कुणाचे नाही.
लळा जिव्हाळा शब्दच खोटे.

पण शरीरातील अवयव जन्मापासूनच एकमेकांशी रक्ताने बांधलेले आहेत म्हणून काय कोण जाणे, पण हे सर्व अवयव एकमेकांना स्वतःच जीव धोक्यात घालून, त्यांच्यावरील हा औषधांचा मूक अत्याचार दूर करण्यासाठी आपलं आयुष्य पणाला लावीत असतात.

हे डाॅक्टरांचे नशीब !

वैद्य सुविनय दामले.
कुडाळ सिंधुदुर्ग.
9673938021
19.04.2017

Avatar
About (वैद्य) सुविनय दामले 453 Articles
वैद्य सुविनय दामले हे कुडाळ, सिंधूदुर्ग येथील सुप्रसिद्ध आयुर्वेदाचार्य आहेत. ते आयुर्वेद या विषयावर विपुल लेखन करतात तसेच व्याख्यानेही देतात.

Be the first to comment

Leave a Reply

Your email address will not be published.


*


महासिटीज…..ओळख महाराष्ट्राची

गडचिरोली जिल्ह्यातील आदिवासींचे ‘ढोल’ नृत्य

गडचिरोली जिल्ह्यातील आदिवासींचे

राज्यातील गडचिरोली जिल्ह्यात आदिवासी लोकांचे 'ढोल' हे आवडीचे नृत्य आहे ...

अहमदनगर जिल्ह्यातील कर्जत

अहमदनगर जिल्ह्यातील कर्जत

अहमदनगर शहरापासून ते ७५ किलोमीटरवर वसलेले असून रेहकुरी हे काळविटांसाठी ...

विदर्भ जिल्हयातील मुख्यालय अकोला

विदर्भ जिल्हयातील मुख्यालय अकोला

अकोला या शहरात मोठी धान्य बाजारपेठ असून, अनेक ऑईल मिल ...

अहमदपूर – लातूर जिल्ह्यातील महत्त्वाचे शहर

अहमदपूर - लातूर जिल्ह्यातील महत्त्वाचे शहर

अहमदपूर हे लातूर जिल्ह्यातील एक महत्त्वाचे शहर आहे. येथून जवळच ...

Loading…

error: या साईटवरील लेख कॉपी-पेस्ट करता येत नाहीत..