नवीन लेखन...

जगण्याचे साधे सोप्पे नियम – भाग दोन

नियम एक.
कोणताच नियम पाळू नये. भाग दोन.

दूध म्हणजे विष नाही, दही म्हणजे विष नाही, गुळ म्हणजे विष नाही, पाणी म्हणजे विष नव्हे, पण हे पदार्थ प्रमेहामधे रोगाचे कारण सांगितलेले आहे. हे विसरून चालणार नाही. म्हणजे हे पदार्थ बंद करायला हवेत असं नाही. आपली प्रकृती आपली पचनशक्ती जर कफाकडे जाणारी, कफ वाढवणारी असेल, तर या पदार्थांचा वापर करताना युक्तीचा वापर करायला हवा. हे सर्व पदार्थ पचायला जड आहेत. हे पदार्थ खाल्ले आणि काहीच व्यायाम केला नाही तर मात्र गडबड होणार हे नक्की.

सकाळी उठल्यापासून रात्री झोपेपर्यंत खावे, दोन मुख्य जेवणे या वेळेत झाली, की त्याचे पचन सूर्य करतो, पचन सोपे होते, हा नियम झाला, पण एखादे वेळी दोनापैकी एक जेवण झालेच नाही, आणि सूर्यास्तानंतर खूप भूक लागली तर काय करावे ?
मस्त जेवावे.
फक्त अशा वेळी लक्षात ठेवावे की, सूर्यासारखा, पचनाला मदत करणारा अग्नी हा अत्यंत महत्त्वाचा घटक शरीराला पचनासाठी वापरता येणार नाही, तेव्हा फार लोड येईल असे खाऊ नये. जे काही खाऊ ते चापून खाण्याऐवजी हातचे राखून खावे, मटण चिकन, श्रीखंड, गुलाबजाम असे पचायला जड होणारे जेवण तर अजिबात नको. ही युक्ती हवी.
असे जड जेवण घेतले तर त्याचे पचन पूर्ण होण्यासाठी तसाच व्यायाम, तसेच कष्ट, तशीच मेहनत करायला हवी. नाहीतर सगळेच ओमफस्स !

संकष्टीला दिवसभर उपवास करून रात्री उशीरा चंद्रोदय झाल्यावर मोदकाचे जेवण जेवावे, या संकल्पनेमधे आपण नियम मोडलाच. पण दिवसभर उपाशी आहोत, स्वतः ठरवून, जाणून बुजुन, व्रत म्हणून, मनाला संयम घालून दिवसभर उपवास करून रात्री जेवलात तर ते क्षम्य ठरू शकते. पण ते सुद्धा महिन्यातून एक वेळ नियमाला हा अपवाद आहे. आम्ही अपवादाचा नियम केला की, सत्यानाश !

चातुर्मास करताना, या चार महिन्यात “देव झोपतो”, अशी आपली संकल्पना आहे. या चार महिन्यात देवच जर झोपला, तर शरीराचे सर्व व्यवहार आपल्यालाच पहावे लागणार आहेत, उगाच काही मोठे निर्णय घेण्याची चूक करू नये, याचे भान राखून आपण आपले व्यवहार करावेत, ही युक्ती आहे. हे आपल्या लक्षात असावे, म्हणून चातुर्मासामधे काही विशिष्ट व्रते सांगितली जातात. एखाद्या वेळी एखादा उपवास चुकुन मोडला, म्हणून लगेच, ” आता उपास मोडलाच आहे, भजी खाऊन घेऊया” असा विचार करणे ही चुक आहे.

तारतम्य बाळगणे, योग्य अयोग्याचा विचार करणे ही युक्ती असते. एखादी कृती दुसरा करतोय मग मी का नको ? असा विचार करणे चूक आहे असे नाही, पण त्यासाठी मला, जशाच्या तसा “दुसरा” बनणे आवश्यक आहे.

व्यायामाचे तेच आहे. व्यायाम जरूर करावा, पण कोणी करू नये, हे पण शास्त्रात सांगितलेले आहे.

प.पू. रामदेव स्वामी महाराज शीर्षासन करून हातावर चालतात, मग मला का नाही जमणार असे एखाद्यानं ठरवले आणि तसं करण्याचा प्रयत्न केला तर काय होईल ? नाक तोंड फुटेल बाकी काही नाही. यासाठी तसा अभ्यास, तसे सातत्य, पहिल्यापासून हवे, तर जमेल. नाहीतर नाही.

शेवटी नियम हे आपल्याला मर्यादा समजावी म्हणून सांगितलेले असतात. तसेच्या तसे ते तंतोतंत पाळणे आणि सगळे नियम धाब्यावर बसवणे, दोन्ही चुकच !
युक्ती वापरली की, सगळ्याचा उपभोग घेता येतो. त्याचा हेतु योग्य असला की झालं.

वैद्य सुविनय दामले.
कुडाळ सिंधुदुर्ग.
9673938021
11.04.2017

Avatar
About (वैद्य) सुविनय दामले 453 Articles
वैद्य सुविनय दामले हे कुडाळ, सिंधूदुर्ग येथील सुप्रसिद्ध आयुर्वेदाचार्य आहेत. ते आयुर्वेद या विषयावर विपुल लेखन करतात तसेच व्याख्यानेही देतात.

Be the first to comment

Leave a Reply

Your email address will not be published.


*


महासिटीज…..ओळख महाराष्ट्राची

गडचिरोली जिल्ह्यातील आदिवासींचे ‘ढोल’ नृत्य

गडचिरोली जिल्ह्यातील आदिवासींचे

राज्यातील गडचिरोली जिल्ह्यात आदिवासी लोकांचे 'ढोल' हे आवडीचे नृत्य आहे ...

अहमदनगर जिल्ह्यातील कर्जत

अहमदनगर जिल्ह्यातील कर्जत

अहमदनगर शहरापासून ते ७५ किलोमीटरवर वसलेले असून रेहकुरी हे काळविटांसाठी ...

विदर्भ जिल्हयातील मुख्यालय अकोला

विदर्भ जिल्हयातील मुख्यालय अकोला

अकोला या शहरात मोठी धान्य बाजारपेठ असून, अनेक ऑईल मिल ...

अहमदपूर – लातूर जिल्ह्यातील महत्त्वाचे शहर

अहमदपूर - लातूर जिल्ह्यातील महत्त्वाचे शहर

अहमदपूर हे लातूर जिल्ह्यातील एक महत्त्वाचे शहर आहे. येथून जवळच ...

Loading…

error: या साईटवरील लेख कॉपी-पेस्ट करता येत नाहीत..