नवीन लेखन...

जगण्याची साधी सोप्पी तत्वे – भाग छत्तीस

आयुर्वेदातील मार्गदर्शक तत्वे-क्रमांक नऊ

कामासाठी दिवस, विश्रांतीसाठी रात्र-भाग एक

आपण सूर्यवंशी आहोत. आपला दिवस सूर्योदयाला सुरवात होतो आणि रात्री संपतो. सर्वसाधारणपणे सगळीकडे असेच चालते. असेच चालावे, कारण दिवसा सूर्य असतो आणि रात्री सूर्य नसतो.

निद्रा म्हणजे झोप ही रात्रीच प्रशस्त आहे. शरीर दिवसभर काम करून दमते, त्याला विश्रांती ही हवीच ! अन्यथा इंजिनकडून फक्त काम करून घेतले गेले आणि पुरेशी विश्रांती दिली नाही तर इंजिनचे आयुष्य लवकर संपुष्टात येते. साधा ब्लेंडर आणला तर त्याच्यावर सूचना लिहिलेली असते. हे मशीन फक्त दहा मिनीटे सुरू ठेवावे. नाहीतर याची गॅरंटी वाॅरंटी काही मिळणार नाही. अगदी बारीक अक्षरात हे लिहिलेले असते. त्यामुळे कोणी नीटसे वाचत नाही, वाचले तरी फारसे लक्ष देत नाही, शेवटी परिणाम व्हायचा तोच होतो, मशीन अकाली बंद पडते.

इसापनीती मधील दोन कष्टकरी मुलांची ती गोष्ट आठवत असेलच ! वडील आपल्या दोन्ही मुलांना एका दिवसात जास्त उत्पन्न आणण्यासाठी काम करायला सांगतात. पहिला एक जण न थांबता, दिवसभर राब राब राबतो, न थांबता कष्ट करतो. न थांबल्यामुळे त्याच्याकडील हत्यारे देखील दमतात, त्यांची धार जाते. धार गेलेल्या हत्यारांनी काम करायला जास्ती शक्ती संपून जाते. उत्न्नावर परिणाम होतो. उत्पादन कमी भरते.

तर दुसरा मधे मधे थांबून पुरेशी विश्रांती घेऊन पुनः दुप्पट वेगाने काम करतो, विश्रांतीच्या वेळी आपल्या हत्याराना धार काढून परत कार्यक्षम बनवणे, आदि कामे करतो. ( विश्रांती म्हणजे गाढ झोपलेच पाहिजे असे नाही हो, ) परिणाम दुसऱ्या मुलाची कार्यक्षमता आणि उत्पादनक्षमता दोन्ही वाढते.

माॅरल ऑफ द स्टोरी काय ?
काम करताना पुरेशी विश्रांती घ्यावी.

“पुरेशी” या शब्दाचा आणखी थोडा खुलासा, स्पष्टीकरण करावे लागेल. प्रत्येकाचं हे “पुरेसं ” वेगळं असतं. हे प्रत्येकाच्या प्रकृतीनुसार ठरतं. पुनः त्यासाठी नियम करून काम करू नये, किंवा तशी विश्रांती ठरवू नये. नाहीतर पुनः गोंधळ होईल. हेच तर आयुर्वेदाचे वैशिष्ट्य आहे. म्हणून तर आपण पहिला नियम केला की, “कोणताही नियम पाळू नये.”

आयुर्वेद सांगतो, विश्रांती ही रात्रीच घ्यावी. निसर्ग पण हेच सांगतो, विश्रांती रात्रीच घ्यावी. सगळे पशुपक्षी दिवसा खातापितात, आणि रात्री विश्रांती घेतात. अपवाद वटवाघुळ, घुबड आदि निशाचर प्राणी. आणि माणसांमधील शिफ्ट ड्यूटी करणारे प्राणी !

गरज म्हणून, पोटासाठी, रात्री जागरण करून नोकरी चाकरी करावी लागते. आपले आपल्या कुटुंबाचे पोट एका बाजूने भरत जायचे, रात्री पैसे मिळवत जायचे, तर दुसऱ्या बाजूने ते दिवसाढवळ्या डाॅक्टरांचे पोट भरायला सहजपणे देऊन जायचे !

असंच चाललंय, अवतीभवती. पोटाला चिमटा घेत, श्रम करायचे आणि अन्न पचत नाही, पोट दुखतंय ही तक्रार घेत डाॅक्टरांकडे जायचं. पोट आणि खिसा दोन्ही फाडून घ्यायचं. हे कुठंवर चालायचं ?

हे असंच चालायचं, असं म्हणून नाही चालायचं. समस्या आहे तिथे उत्तर आहे. शोधा म्हणजे सापडेल.

वैद्य सुविनय दामले.
कुडाळ सिंधुदुर्ग.
9673938021
16.05.2017

Avatar
About (वैद्य) सुविनय दामले 453 Articles
वैद्य सुविनय दामले हे कुडाळ, सिंधूदुर्ग येथील सुप्रसिद्ध आयुर्वेदाचार्य आहेत. ते आयुर्वेद या विषयावर विपुल लेखन करतात तसेच व्याख्यानेही देतात.

Be the first to comment

Leave a Reply

Your email address will not be published.


*


महासिटीज…..ओळख महाराष्ट्राची

गडचिरोली जिल्ह्यातील आदिवासींचे ‘ढोल’ नृत्य

गडचिरोली जिल्ह्यातील आदिवासींचे

राज्यातील गडचिरोली जिल्ह्यात आदिवासी लोकांचे 'ढोल' हे आवडीचे नृत्य आहे ...

अहमदनगर जिल्ह्यातील कर्जत

अहमदनगर जिल्ह्यातील कर्जत

अहमदनगर शहरापासून ते ७५ किलोमीटरवर वसलेले असून रेहकुरी हे काळविटांसाठी ...

विदर्भ जिल्हयातील मुख्यालय अकोला

विदर्भ जिल्हयातील मुख्यालय अकोला

अकोला या शहरात मोठी धान्य बाजारपेठ असून, अनेक ऑईल मिल ...

अहमदपूर – लातूर जिल्ह्यातील महत्त्वाचे शहर

अहमदपूर - लातूर जिल्ह्यातील महत्त्वाचे शहर

अहमदपूर हे लातूर जिल्ह्यातील एक महत्त्वाचे शहर आहे. येथून जवळच ...

Loading…

error: या साईटवरील लेख कॉपी-पेस्ट करता येत नाहीत..